शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

लंडनसाठी ‘सिंग साहब’ बनले ‘पटेल’

By admin | Updated: June 8, 2017 02:20 IST

दोन पंजाबी नागरिकांनी लंडनचा व्हिसा मिळविण्यासाठी ‘सिंग’ वरून स्वत:चे नाव ‘पटेल’ असे बदलत

गौरी टेंबकर - कलगुटकर। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दोन पंजाबी नागरिकांनी लंडनचा व्हिसा मिळविण्यासाठी ‘सिंग’ वरून स्वत:चे नाव ‘पटेल’ असे बदलत, त्या नावाने पासपोर्ट बनवला. मात्र, आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांची भाषा आणि वेशभूषेमुळे ते सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडले आणि सहार पोलिसांनी मंगळवारी त्यांना अटक केली.सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी मघरसिंग (३०), आणि त्याचा अन्य एक मित्र आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंगापूरला निघाले होते. मात्र, सिक्युरिटी काउंटरवर कागदपत्रांची पडताळणी करताना पासपोर्टवर त्यांचे नाव त्यांनी ‘पटेल’ असे लिहिले होते. मात्र, त्यांची भाषा आणि काही प्रमाणात वेशभूषा ही संबंधित अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटली. त्यामुळे त्यांनी या दोघांची चौकशी केली. ज्यात आम्ही ‘पटेल’ नसून, ‘सिंग’ असल्याचे त्यांनी कबूल केले. त्यानुसार त्यांना सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हे दोघे पंजाबचे राहणारे असून २००९मध्ये ते सिंगापूरला टुरिस्ट व्हिसावर जाऊन आले होते. कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणाऱ्या दोघांना लंडनमध्ये कायमचे वास्तव्यास जायचे होते. त्यामुळे त्यांनी हा बनावट पासपोर्ट बनवल्याचे सहार पोलिसांना सांगितले आहे. त्यांना बुधवारी स्थानिक न्यायालयात नेले असता, १२ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.>एजंट म्हणाला म्हणून...अहमदाबाद पासपोर्ट आॅफिसमध्ये हे दोघे एका एजंटला भेटले. जिथे त्यांनी आधार कार्ड आणि लिव्हिंग सर्टिफिकेट देऊन पासपोर्ट बनविला. पंजाबी लोकांना लंडनमध्ये नोकरीसाठी प्रवेशबंदी असल्याने त्यांनी यावर पटेल, असे आडनाव लावले. मात्र, हा पासपोर्ट कोरा असल्याने एखादी तरी व्हिसा एन्ट्री त्यावर असणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी याच पासपोर्टमार्फत सिंगापूरला जाण्याचे ठरविले. ज्यामुळे पासपोर्टवर एन्ट्री होईल आणि पुढे तोच पासपोर्ट लंडनला जाण्यासाठी वापरता येईल आणि कोणालाही संशय येणार नाही. तसेच पुढे तेथे नागरिकत्वही तुम्हाला मिळेल, असे एजंटने दोघांना सांगितले. याला बळी पडत दोघांनी बनावट पासपोर्ट बनविल्याचे पोलिसांना सांगितले.