शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

हस्ताक्षरातील पासपोर्ट ठरणार कालबाह्य

By admin | Updated: November 20, 2015 00:41 IST

परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय : मंगळवारपासून अंमलबजावणी, इलेक्ट्रॉनिक पद्धतीतील पासपोर्ट सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्त्वाचे

कोल्हापूर : ज्या नागरिकांचे दहा अथवा वीस वर्षांच्या कालावधीसाठीचे हस्ताक्षरातील पासपोर्ट आहेत. शिवाय त्यांनी ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नवीन स्वरूपात करून घेतलेले नाहीत, अशा पासपोर्टधारकांना आता परदेशात प्रवेश मिळणार नाही. याबाबतचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी मंगळवार (दि. २४) पासून होणार आहे.गेल्या पाच ते सात वर्षांपूर्वी वीस आणि दहा वर्षांच्या कालावधीसाठी पासपोर्ट देण्यात आले होते. हे पासपोर्ट हस्ताक्षरात लिहिलेले होते. मात्र, सुरक्षितता आणि अचूकतेसाठी परराष्ट्र मंत्रालयाने संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तयार केलेले पासपोर्ट देणे सुरू केले. हस्ताक्षरातील ज्यांचे पासपोर्ट आहेत. त्यांनी ते नवीन करून घ्यावेत, अशा सूचना परराष्ट्र मंत्रालयाने प्रवासी सेवा पुरविणाऱ्या संस्था आणि विविध माध्यमांद्वारे दिल्या होत्या. त्यानंतर आता १७ नोव्हेंबरला परराष्ट्र मंत्रालयाने हस्ताक्षरातील पासपोर्ट असणाऱ्या नागरिकांना परदेशात प्रवेश द्यावयाचा नाही, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवार (दि. २४) पासून होणार आहे. याबाबतच्या सूचना परराष्ट्र मंत्रालयाने प्रवासी सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, प्रतिनिधींना दिल्या आहेत. ज्यांचे पासपोर्ट हस्ताक्षरातील असतील त्यांना विमानतळावरूनच मागे फिरावे लागणार आहे. वर्षभरापूर्वी दिलेली सूचना बेदखल करून हस्ताक्षरातील पासपोर्ट घेऊन बसलेल्या लोकांना या निर्णयामुळे फटका बसणार आहे. कोल्हापुरातील ९५ टक्के  नवीन पासपोर्टपर्यटन तसेच विविध कामांनिमित्त परदेशवारी करणाऱ्यांचे कोल्हापुरातील प्रमाण वर्षागणिक वाढत आहे. साधारणत: महिन्याला सहाशेजण पासपोर्ट काढतात. ते नवीन स्वरूपातील असल्याचे ‘ट्रेडविंग्ज’ कोल्हापूरचे व्यवस्थापक बी. व्ही. वराडे यांनी सांगितले. ते म्हणाले, इलेक्ट्रॉनिक पद्धतीतील नवे पासपोर्ट हे सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. हस्ताक्षरातील पासपोर्टधारकांना प्रवास बंदीचा परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेला निर्णय चांगला आहे. हस्ताक्षरातील पासपोर्टधारकांची देशातील संख्या सुमारे ६० हजारांपर्यत आहे. कोल्हापुरातील ९५ टक्के पासपोर्ट नव्या स्वरूपातील आहेत. ज्यांना भविष्यात कोणत्याही परदेशात जायचे नाही, अशा व्यक्तींनी हस्ताक्षरातील पासपोर्ट बदलून घेण्याची तसदी घेतलेली नाही. अशा व्यक्तींचेही प्रमाण बऱ्यापैकी आहे. ज्यांनी व्हिसा काढला आहे आणि त्यांना २४ नोव्हेंबरनंतर प्रवास करायचा आहे. त्यांना आता प्रवासाचे नियोजन पुढे ढकलून नवीन पासपोर्ट काढण्याशिवाय पर्याय नाही. (प्रतिनिधी)बनावटगिरीला चापहस्ताक्षरातील पासपोर्टमध्ये बनावटगिरी करता येत होती. त्याला चाप बसविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीतील नवीन पासपोर्ट बनविण्यात आले आहेत. या नव्या पासपोर्टचे पहिल्यांदा स्क्रिनिंग केले जाते. त्यामुळे पासपोर्ट क्रमांक अथवा नाव हे विमानतळावरील संगणकीकृ त यंत्रणेवर प्रवेशित केल्यानंतर पासपोर्टधारकांची माहिती समजते. शिवाय जगातील कोणत्याही विमानतळावर पासपोर्ट पाहता येतो.