शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी प्रवाशांची उडणार तारांबळ

By admin | Updated: January 9, 2016 03:00 IST

जर तुमची मुंबईतून सुटणारी ट्रेन रविवारी असेल अथवा तुम्ही रविवारी मुंबईत पोहोचणार असाल तर थोडे थांबा... कारण मुंबईतून सुटणाऱ्या व मुंबईत येणाऱ्या तब्बल ४२ ट्रेनच्या वेळापत्रकात डोक्याला ताप ठरतील

मुंबई : जर तुमची मुंबईतून सुटणारी ट्रेन रविवारी असेल अथवा तुम्ही रविवारी मुंबईत पोहोचणार असाल तर थोडे थांबा... कारण मुंबईतून सुटणाऱ्या व मुंबईत येणाऱ्या तब्बल ४२ ट्रेनच्या वेळापत्रकात डोक्याला ताप ठरतील असे बदल ‘मरे’नेकेले आहेत. यातील मुंबईत येणाऱ्या काही ट्रेन तर नाशिक, पुणे व पनवेलपर्यंतच येणार आहेत; आणि मुंबईतून सुटणाऱ्या काही ट्रेनची स्थितीही अशीच काहीशी प्रवाशांसाठी पायपीट करणारी ठरणार आहे. या ब्लॉकमुळे ठाण्याहून विशेष बस सोडण्यात येणार आहे.१३६ वर्षे जुना असलेला हँकॉक पूल पाडण्याचे काम ९ जानेवारीच्या मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून घेण्यात येणार आहे. यासाठी १८ तासांचा ब्लॉक घेऊन रविवारी संध्याकाळी ६.२० वाजेपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल. या कामासाठी रविवारी मुंबई येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या तब्बल ४२ मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे जवळपास ८ कोटींचा रिफंड प्रवाशांना द्यावा लागणार आहे. मुंबईतून जाणाऱ्या १५ हजार प्रवाशांना याचा फटका बसेल. हा मनस्ताप सहन करावा लागत असतानाच आणखी एका मोठ्या त्रासाला मेल-एक्स्प्रेस ट्रेनच्या प्रवाशांना सामोरे जावे लागेल. ब्लॉकमुळे मुंबईतून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस ट्रेनच्या सुरुवातीच्या तसेच अंतिम स्थानकात बदल करण्यात आला आहे. १० जानेवारी रोजी सीएसटीकडे येणाऱ्या १९ मेल-एक्स्प्रेस ट्रेनला अंतिम थांबे हे ठाणे, पनवेल, दादर, पुणे, कल्याण येथे देतानाच मनमाड आणि नाशिक रोड येथेही देण्यात आले आहेत. याच दिवशी सीएसटीहून सुटणाऱ्या १३ मेल-एक्स्प्रेसच्या सुरुवातीच्या स्थानकातही बदल करण्यात आले असून, त्या पनवेल, दादर, ठाणे, पुणे, नाशिक येथून सोडण्यात येणार आहेत.(कंसात अंतिम स्थानक)अमृतसर एक्स्प्रेस (ठाणे), मेंगलोर एक्स्प्रेस (पनवेल), हैदराबाद हुस्सेनगर एक्स्प्रेस (दादर), मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस (पनवेल), सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस (दादर), गोेंदिया विदर्भ एक्स्प्रेस (ठाणे), छत्रपती शाहू महाराज महालक्ष्मी एक्स्प्रेस (ठाणे), फिरोजपूर पंजाब मेल (ठाणे), नागपूर दुरन्तो एक्स्प्रेस (दादर), नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस (दादर), हैदराबाद एक्स्प्रेस (ठाणे), चेन्नई एक्स्प्रेस (दादर), कन्याकुमारी एक्स्प्रेस (पुणे), हावडा मेल (मनमाड), सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस (कल्याण), हावडा कोलकाता मेल (मनमाड), लखनौ पुष्पक एक्स्प्रेस (नाशिक रोड), हावडा गीतांजली एक्स्प्रेस (ठाणे), नांदेड तपोवन एक्स्प्रेस (नाशिक रोड)१० जानेवारी : सीएसटीहून सुटणाऱ्या ट्रेन - पुढील स्थानकातून सुटतीलमडगाव मांडवी एक्स्प्रेस (पनवेल), बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस (दादर), हैदराबाद एक्स्प्रेस (दादर), नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस (दादर), नागपूर दुरंन्तो एक्स्प्रेस (दादर), मेंगलोर एक्स्प्रेस (पनवेल), हावडा गीतांजली एक्स्प्रेस (ठाणे), नांदेड तपोवन एक्स्प्रेस (नाशिक), लखनौ पुष्पक एक्स्प्रेस (नाशिक), कन्याकुमारी एक्स्प्रेस (पुणे), हावडा मेल (मनमाड), सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस (कल्याण), हावडा कोलकाता मेल (मनमाड)