शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तेजसबाबत प्रवाशांनी लावला तक्रारींचा सूर

By admin | Updated: May 24, 2017 17:10 IST

मोठा गाजावाजा करत कोकण रेल्वेनं चाकरमान्यांच्या सेवेत तेजस एक्स्प्रेस नावाची नवी ट्रेन दाखल केली.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 24 - मोठा गाजावाजा करत कोकण रेल्वेनं चाकरमान्यांच्या सेवेत तेजस एक्स्प्रेस नावाची नवी ट्रेन दाखल केली. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्याचाही रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. मात्र तेजस एक्स्प्रेसनं प्रवाशांची निराशा केली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटलेली तेजस एक्स्प्रेस सुस्थितीत करमाळीत पोहोचली. मात्र करमाळीहून परततानाही तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना घाणीचं साम्राज्य पाहायला मिळालं. ट्रेनमध्ये जागोजागी अस्वच्छता, दुर्गंधी आणि अपुऱ्या सोयींमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मंगळवारी तेजस एक्स्प्रेस करमाळी स्थानकावरून सुटली, त्यावेळी ट्रेनमध्ये अस्वच्छता पाहायला मिळाली. तसंच तेजस एक्स्प्रेसमधील शौचालय स्वच्छ न ठेवल्यामुळे अनेक डब्यात दुर्गंधी पसरली होती. तेजस एक्स्प्रेसमधील एका कुटुंबाला स्वयंचलित दरवाज्यांमुळे त्रास झाला आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचा मज्जा लुटणा-या प्रवाशांच्या हालाला पारावार उरला नव्हता. एक मुलगा रत्नागिरी स्टेशनला उतरला, मात्र त्याच वेळी अचानक ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले. त्यामुळे त्याला ट्रेनमध्ये प्रवेश करता आला नाही. नाइलाजास्तव त्या तरुणाला रत्नागिरी स्थानकावर दुस-या ट्रेनची वाट पाहावी लागली. तर त्याचे कुटुंबीय मुंबईला पुढे निघून गेले. त्यामुळे कोणतेही स्टेशन आल्याची आणि दरवाजे बंद कधी होणार असल्याची उद्घोषणा करावी, अशी मागणी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. 
 
तत्पूर्वी ताशी तब्बल 200 किलोमीटर वेगाने धावणारी देशातील सर्वात वेगवान ट्रेन असे बिरुद मिरवणारी ‘तेजस’ एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्गावर अखेर सोमवारी धावली. दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी सुटलेली तेजस एक्स्प्रेस रात्री 12.35 वाजता करमाळी(गोवा) स्थानकात पोहोचण्याची वेळ असतानाच उशिरा दाखल झाली.  तेजस एक्स्प्रेसला छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कुडाळ आणि करमाळी अशा स्थानकांवरच थांबा देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे रविवारी शर्मा आणि अन्य अधिकाऱ्यांनी ‘तेजस’ एक्स्प्रेसचे (मुंबई-करमळी) निरीक्षण केले होते. त्या वेळी ते म्हणाले होते की, ‘गेली तीन वर्षे ‘तेजस’ एक्स्प्रेससाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.’ प्रवाशांच्या गरजांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या या गाडीतून प्रवास करण्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.