शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बर्थविना होताहेत प्रवाशांचे हाल

By admin | Updated: June 5, 2016 20:43 IST

उन्हाळ्यात वेटिंग वाढल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 5-  उन्हाळ्यात वेटिंग वाढल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. कडक उन्हात बर्थशिवाय अनेक प्रवाशांना प्रवास करण्याची पाळी आली. परंतु जून महिना सुरू झाल्यानंतरही प्रवाशांचे हाल कमी झाले नाहीत. अद्यापही रेल्वेगाड्यातील वेटिंगची स्थिती जैसे थे आहे. २० जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.उन्हाळ्यात अनेक नागरिक बाहेरगावी जाण्याचे प्लॅनिंग करतात. यामुळे या काळात रेल्वेगाड्यातील वेटिंग वाढलेले असते. अनेक गाड्यात तर तिकीटही मिळत नाही म्हणजे रिग्रेटची स्थिती असते. परंतु उन्हाळा संपत आला तरी प्रवाशांचे हाल संपले नसून अद्यापही त्यांच्या हातात वेटिंगचेच तिकीट मिळत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात विदर्भ एक्स्प्रेसमध्ये १५ जूनपर्यंत १०० ते ११५ वेटिंग, दुरांतो एक्स्प्रेसमध्ये १३ जूनपर्यंत ९१ वेटिंग, सेवाग्राम एक्स्प्रेस १२ जूनपर्यंत ६१ वेटिंग आहे.पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात नागपूर-पुणे एक्स्प्रेस १३ जूनपर्यंत ९५ वेटिंग, गरीबरथमध्ये १७ जूनपर्यंत ४५ वेटिंग आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात स्वर्णजयंती एक्स्प्रेसमध्ये ३५ वेटिंग, एपी संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये ११ जूनपर्यंत ३० वेटिंग, गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये १४ जूनपर्यंत २९ वेटिंग, तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये ११ आणि १२ जूनला रिग्रेटची स्थिती असून केरळ एक्स्प्रेसमध्ये ६६ वेटिंग आहे. चेन्नईकडे जाणाऱ्या गाड्यात थिरुक्कुरल एक्स्प्रेसमध्ये १९ जूनपर्यंत वेटिंग, जीटी एक्स्प्रेसमध्ये ११ जूनपर्यंत वेटिंग, तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये १५ जूनपर्यंत वेटिंगची स्थिती आहे. जयपूरकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात बिलासपूर-भगत की कोठी एक्स्प्रेसमध्ये १५ जूनपर्यंत वेटिंग, पुरी एक्स्प्रेसमध्ये १४ जूनपर्यंत ५० वेटिंग, जयपूर एक्स्प्रेसमध्ये १२ जूनपर्यंत ४३ वेटिंग आहे. साधारणत: नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये जवळपास २० जूनपर्यंत वेटिंगची स्थिती आहे. त्यानंतरच प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळू शकेल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.