शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जलबचतीत शासकीय कार्यालयांचा सहभाग

By admin | Updated: May 30, 2016 03:38 IST

पाणीपातळीमुळे निर्माण झालेल्या पाणीप्रश्नावर उपाय म्हणून ‘लोकमत’ने सुरू केलेल्या पाणीबचत आणि संवर्धनाच्या मोहिमेला आता शासकीय कार्यालयांमधून प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई : राज्यात खोल गेलेल्या पाणीपातळीमुळे निर्माण झालेल्या पाणीप्रश्नावर उपाय म्हणून ‘लोकमत’ने सुरू केलेल्या पाणीबचत आणि संवर्धनाच्या मोहिमेला आता शासकीय कार्यालयांमधून प्रतिसाद मिळत आहे. जळगावमधील १७ मजली महापालिकेच्या भव्य इमारतीतील पाणीगळती रोखण्यासाठी स्थानिक प्लंबर असोसिएशनने पुढाकार घेऊन नळाच्या तोट्या बदलून गळती पूर्णपणे बंद केली.शहरांमधील वाढते नागरीकरण आणि पावसाच्या लहरीपणामुळे राज्यातील जलसाठे अपुरे पडत असल्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांत पाण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या कठीण परिस्थितीशी सामना करण्यासाठी आणि भविष्यात पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी जलसाक्षरता आणि पाण्याच्या उपयुक्ततेविषयी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागरण करण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानाला लोकांचा जोरदार पाठिंबा आणि प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जळगावमधील महापालिका प्रशासनाने पाणीगळतीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळांच्या तोट्या बदलण्याचे ठरविले. पालिकेच्या या निर्णयाला प्रतिसाद म्हणून येथील प्लंबर्स असोसिएशनने हे मोफत करून देण्याचे ठरविले. सुमारे ३५ ते ४० जणांच्या चमूने दोन दिवस हे काम केल्याने लाखो लिटर्स पाण्याची बचत होत असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>आपणही हे करू शकता...घरातील लहान मुलांमध्ये नळाच्या तोट्या बंद करण्याविषयी जनजागृती कराघरातील प्राण्यांसमोर ठेवलेले शिळे पाणी टाकून न देता झाडाला घाला.घरगुती उपकरणे घेताना अधिक पाणी बचत करणारी घ्या. (उदा. रेफ्रिजरेटर, कूलर आदी)जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय आणि नगरपालिका किंवा महापालिकांची कार्यालये असतात. दिवसभर या ठिकाणी कामासाठी नागरिकांची ये-जा असते. अशा कार्यालयांमधील पाणीगळती रोखून रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प केल्यास लाखो लीटर पाणी वाचेल आणि तेवढेच पाणी पावसाळ्यात जमिनीत मुरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होऊ शकते.भविष्यात सर्वांना पाणी उपलब्ध होण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. सरकारच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांनीदेखील पाणी बचत करण्यासाठी छोटे आणि घरगुती उपाय करायला हवेत. यासाठी नामांकित खेळाडूंनीही पुढाकार घेऊन जनजागृती करावी.- प्रार्थना ठोंबरे, आंतरराष्ट्रीय मानांकित टेनिसपटू