शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील मोऱ्यांचे अर्धवट काम

By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST

सैनवाडी व पोलीस ठाण्यानजीक असलेल्या दोन मोऱ्यांच्या कामांना एक वर्ष पूर्ण होवूनही याठिकाणचे बांधकाम मात्र अर्धवट अवस्थेतच आहे.

धाटाव : रोहा-कोलाड रस्त्यावरील धाटाव परिसरातील सैनवाडी व पोलीस ठाण्यानजीक असलेल्या दोन मोऱ्यांच्या कामांना एक वर्ष पूर्ण होवूनही याठिकाणचे बांधकाम मात्र अर्धवट अवस्थेतच आहे. या रस्त्यावर आजही साईडपट्ट्यांचा बऱ्याच ठिकाणी अभाव दिसून येतो. या अर्धवट कामांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. सतत वर्दळ सुरू असलेल्या या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.गतवर्षी पावसाळा सुरू होण्याआगोदरच मे महिन्याच्या अखेरीस या दोनही मोऱ्यांची कामे सुरू झाली. या सुरू असलेल्या मोऱ्यांच्या कामांमुळे पर्यायी म्हणून धाटाव औद्योगिक वसाहतीच्या अंतर्गत रस्त्याचा त्याप्रसंगी वाहतुकीकरिता वापर करण्यात आला होता. अवघ्या आठ दिवसांनी शाळा सुरू होणार असून या रस्त्यावर पुन्हा शालेय विद्यार्थीवर्गाची रहदारी वाढणार आहे. सध्या या रस्त्यावरून धाटाव औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. सततचा वर्दळीचा रस्ता म्हणून रोहा-कोलाड रस्ता सुपरिचित आहे. भरधाव जाणाऱ्या वाहनांना या रस्त्यावरील मोऱ्यांच्या अर्धवट बांधकामांचा अंदाज न आल्याने व साईडपट्ट्यांच्या अभावामुळे कित्येक अपघात घडले आहेत. त्यातच रस्त्यालगत असलेल्या मोठमोठ्या वृक्षांचाही अडथळा अपघाताला कारणीभूत ठरत आहे. एका वर्षापूर्वी सुरू केलेल्या या मोऱ्यांची कामांच्या कार्यारंभ आदेशाची रक्कम ५२ लाख रूपये एवढी आहे. मात्र या दोन मोऱ्यांच्या कामाकरिता आजवर एकूण २५ लाख ५४ हजार रूपये एवढा खर्च झाला आहे. आज या कामाला तब्बल एक वर्ष पूर्ण झाले असून सध्या दोनही मोऱ्यांवरील स्लॅब टाकून झाल्यानंतर दोेन महिन्याच्या कालावधीनंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र या मोऱ्यांलगत असलेल्या कठड्यांचे काम मात्र आजही अर्धवट अवस्थेतच आहेत. या रस्त्यावरून सतत प्रवास करणाऱ्या कामगार, पादचाऱ्यांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोऱ्यांवरील कठड्यांचे काम पूण करण्याची मागणी पादचारी करत आहेत. वाळू नसल्याने काम थांबले; ठेके दाराला दिली नोटीसमध्यवर्ती ठिकाणी असलेल्या धाटाव औद्योगिक वसाहतीत रोजीरोटीकरिता कामगार वर्ग याच रस्त्याने प्रवास करतात. तर बहुतांशी शाळकरी विद्यार्थी या परिसरातील गावागावातून रोह्याकडे सायकलवर शाळेत किंवा कॉलेजमध्ये जातात. अलिबाग, मुरुडकडील पर्यटकांना पुण्याकडे जाण्यासाठी हाच सोयीचा रस्ता आहे. दरम्यान, रस्त्यावरील साईडपट्ट्या बऱ्याच ठिकाणी नसल्यामुळे या मोऱ्यांच्या ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडत आहे.बांधकाम अर्धवट असल्याने मोऱ्यांच्या सळ्या वर आल्याचे दिसते. या ठिकाणचे काम सुरू असताना मध्यंतरी वाळू उपलब्ध नसल्यामुळे काम थांबले असल्याचे ठेकेदाराकडून संबंधित विभागाला सांगण्यात आल्याचे समजते. तर संबंधित विभागीय व उपविभागीय स्तरावर या ठेकेदाराला उर्वरित कामाबाबत नोटीस बजावण्यात आल्याचे रोहा सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एम.एस. घाडगे यांनी सांगितले.>रोहा-कोलाड रस्त्यावरील अर्धवट मोऱ्यांच्या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीसद्वारे कळविण्यात आले आहे. सदर ठेकेदाराकडून हे काम लवकर न झाल्यास त्याठिकाणी दुसऱ्या ठेकेदाराला काम देऊन उर्वरित काम लवकरात लवकर करण्यात येईल. - एस.बी. ठाकूर, उपविभागीय अधिकारी,सा.बां. विभाग,रोहा>संरक्षक कठडे हे संरक्षणासाठी असतात. रस्त्यावरील दोन्ही मोऱ्यांच्या ठिकाणी कठडे नसल्यामुळे वाहनचालकांना अडचण होते.एक वर्ष पूर्ण होवूनही काम अर्धवट राहणे म्हणजे निष्काळजीपणाच म्हणावा लागेल.- वीरेंद्र पाशिलकर, सामाजिक कार्यकर्ते>रस्त्यावरून सायकलवर प्रवास करताना रस्त्यालगत साईडपट्ट्या काही ठिकाणी नाहीत, तर अर्धवट काम झालेल्या मोऱ्यांच्या ठिकाणी संरक्षण कठडे नसल्यामुळे अपघाताची शक्यता जाणवते. - शार्दूल मोरे, शालेय विद्यार्थी.