शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट बांधकामाचे फोटो काढून निधी लाटला

By admin | Updated: December 25, 2014 00:27 IST

न झालेल्या पुलांचे काम पूर्ण झाले, अशी खोटी माहिती राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्र सरकारला दिल्याची माहिती कॅगने उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे ज्या पुलासाठी केंद्राने निधी दिला होता

राज्याने केंद्राला दिली खोटी माहिती, प्रकल्प खर्च वाढविलाअतुल कुलकर्णी - नागपूर न झालेल्या पुलांचे काम पूर्ण झाले, अशी खोटी माहिती राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्र सरकारला दिल्याची माहिती कॅगने उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे ज्या पुलासाठी केंद्राने निधी दिला होता त्या पुलाच्या अर्धवट कामाचे फोटो काढून केंद्राला पाठवण्यात आले. कॅगने त्या जागेवर जाऊन फोटो काढून घेतल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे.परभणी जिल्ह्यातील सिरसी गावात गोदावरी नदीवर पुल बांधण्यासाठी सप्टेंबर १९९८ साली आदेश देण्यात आले होते. यासाठी राज्याच्या निधीतून ३.२४ कोटी मंजूर झाले होते. मात्र निधी टंचाईमुळे हे काम केंद्रीय मार्ग निधीतून करण्याचे ठरले. केंद्राने या कामासाठी ४.०५ कोटी रुपये फेब्रुवारी २००४ मध्ये मंजूर केले. कार्यकारी अभियंत्याने पुलासाठी पोच रस्ता बांधण्याचे काम ७३.७९ लाख रुपयांना नोव्हेंबर २००५ मध्ये दिले. केंद्राने निधी दिल्यानंतरही मंद गतीने हे काम चालू झाले. या कामावर २.३७ कोटी रुपये खर्च झाल्यानंतर हे काम संबंधीत कंत्राटदाराकडून नोव्हेंबर २००७ मध्ये काढून घेतले गेले. पुलाचेच काम झाले नाही तेव्हा पोच रस्त्याच्या कामाचे कंत्राट देखील २५.३० लाख रुपये खर्च केल्यानंतर आॅक्टोबर २०१० मध्ये रद्द केले गेले. खरी कमाल येथून सुरु झाली. कंत्राट काढून घेतल्यानंतर जे उर्वरित काम १.३६ कोटीत पूर्ण होणार होते त्याची सुधारित किंमत आॅगस्ट २०११ मध्ये तब्बल ६.५६ कोटी रुपये करण्यात आली. पूल आणि पोच रस्त्याच्या कामाचे संमिश्र कंत्राट राज्य निधीमधून १८ महिन्यात पूर्ण करण्यासाठी या शिवाय जुलै २०१३ मध्ये ८.२३ कोटींना देण्यात आले. ऐवढे करुन जुलै २०१३ अखेर या कामावर ५९ लाख रुपये खर्च झाले. हे सगळे चालू असताना जानेवारी २०११ मधे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम २.७१ कोटीत संतोषजनकरित्या पूर्ण झाल्याचे कळवले. कळवताना पुलाच्या एका बाजूचे फोटो काढून दिले गेले. मात्र कॅगने जून २०१३ साली या कामाची प्रत्यक्ष पहाणीच केली तेव्हा तेथे ना पूल झाला होता ना त्याचा पोचमार्ग. सप्टेंबर १९९८ साली काम सुरु करण्यात आलेला हा पूल १५ वर्षानंतरही पूर्ण झाला नाहीच मात्र या कामात ६.८७ कोटींची वाढ मात्र झाली. असाच प्रकार नरखेड तालुक्यातील जामगाव थडीपवनी मार्गावर वर्धा नदीवर मोठा पूल बांधण्याच्या कामात झाला. हे काम केंद्राच्या निधीतून पूर्ण करण्याचा प्रस्ताव मे २००८ साली सादर केला गेला. जून २०११ साली बांधकाम विभाग नागपूरच्या कार्यकारी अभियंत्यानी केंद्राला काम पूर्ण झाल्याचा अहवाल पाठवून दिला. मात्र मे २०१३ पर्यंत हे काम पूर्णच झालेले नव्हते!असाच प्रकार आपेगाव, कुरनपिंपरी, महारटाकळी, चाकलांबा, शिंगरवाडी मार्गाच्या २२.२० कि.मी. रस्त्याच्या बाबतीत बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. काम पूर्ण झाले असे कळवण्यात आले प्रत्यक्षात काम अजूर्ण होते, व या कामावर झालेला ३.५२ कोटींचा खर्चही निष्फळ ठरला होता.