शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

पडसलगीकर आज स्वीकारणार सूत्रे

By admin | Updated: January 31, 2016 03:19 IST

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्तात्रेय पडसलगीकर मावळते आयुक्त अहमद जावेद यांच्याकडून रविवारी दुपारी पदाची सूत्रे स्वीकारतील. पडसलगीकर यांच्यासाठी

- डिप्पी वांकाणी,  मुंबई

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्तात्रेय पडसलगीकर मावळते आयुक्त अहमद जावेद यांच्याकडून रविवारी दुपारी पदाची सूत्रे स्वीकारतील. पडसलगीकर यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुंबई पोलीस आयुक्तपदाचा दर्जा अवनत करून, पूर्वीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचा केला. शनिवारी तसे आदेश जारी करण्यात आले. पडसलगीकर यांना पदोन्नती मिळाल्यानंतर या पदाचा दर्जा पुन्हा वाढविण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. मुंबईचे पोलीस आयुक्तपद नेहमीच अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे राहिले आहे. मात्र, अहमद जावेद यांना सामावून घेता यावे, यासाठी गेल्या वर्षी दर्जा वाढवून ते पोलीस महासंचालक दर्जाचे करण्यात आले होते. जावेद अहमद हे आधीच पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी होते. त्यांना कमी दर्जाच्या पदावर नियुक्त करता येत नसल्यामुळे पदाचा दर्जा वाढविण्यात आला होता. जावेद अहमद यांच्यापूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्तपद राकेश मारिया यांच्याकडे होते. मात्र, नियोजित पदोन्नतीच्या २२ दिवस आधीच मारियांना पदोन्नती देत, त्यांची बदली करण्यात आली. यावरून वादही निर्माण झाला होता. पडसलगीकर यांच्या नियुक्ती आदेशात पुढील आदेशापर्यंत हे पद अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे राहील, असे म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९८२ च्या तुकडीचे अधिकारी असलेले पडसलीकर यांची पदोन्नती प्रस्तावित आहे. मात्र, खात्याच्या पदोन्नती समितीची (डीपीसी) याबाबत बैठक अद्याप व्हायची आहे. जावेद यांच्या निवृत्तीमुळे पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची संख्या पाचवर आली आहे. डीपीसीची बैठक होऊन पडसलगीकर यांना लगेचच पदोन्नती दिली जाईल किंवा मग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख विजय कांबळे पुढील महिन्यात सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना पदोन्नती मिळेल. पडसलगीकर हे सर्वात ज्येष्ठ अतिरिक्त पोलीस महासंचालक असल्यामुळे त्यांना पदोन्नती दिली जाईल आणि त्यांच्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा दर्जा पुन्हा वाढविला जाण्याची शक्यता आहे, असे पोलीस खात्यातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलीस दलाच्या वतीने शनिवारी नायगाव पोलीस मैदानावर जावेद अहमद यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जावेद यांनी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदक मिळालेल्या मुंबईच्या १३ पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले, तसेच आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल पोलीस दलाचे आभार मानले. मुंबईसाठी काय?पडसलगीकर हे मूळचे सोलापूरचे रहिवासी असून, त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. एक टास्क मास्टर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. खरे तर मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांनाच मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यास इच्छुक होते. मात्र, पडसलगीकर यांनी विनम्रपणे त्यांची विनंती नाकारली होती आणि राकेश मारिया यांना आयुक्त म्हणून कायम ठेवावे, असे त्यांना सांगितले होते. ते आयबीमध्ये दहशतवादविरोधी पथकात सक्रिय होते. त्यांचा तो अनुभव मुंबई पोलिसांना चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. नव्वदीच्या दशकात त्यांनी गुन्हे शाखेत उपायुक्त म्हणून काम केले आहे. त्यामुळे मुंबईचे गुन्हेगारी जगत त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यांच्या रूपाने ९ वर्षांनंतर मुंबईला एक महाराष्ट्रीय पोलीस आयुक्त मिळाला आहे. यापूर्वी डी.एन. जाधव यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती.