ठाणे : येथील बांधकाम व्यावसायिक आणि एमसीएचआयचे माजी अध्यक्ष सुरज परमार यांनी बुधवारी त्यांच्या कासारवडवली भागातील ब्ल्यू रूफ या कॉसमॉस हवाईन येथील कार्यालयात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह मुंबईच्या सर जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.बांधकाम क्षेत्रातील ‘कॉसमॉस’ या बड्या कंपनीचे ते मालक होते. गुरुवारी दुपारी १२च्या सुमारास ते घोडबंदर रोडवरील ब्ल्यू रूफच्या कार्यालयात आले. या ठिकाणी या ग्रुपच्या रो हाऊसेसच्या एका प्रकल्पाचे काम सुरू आहे. तिथे आल्यानंतर साधारण १.२० च्या सुमारास त्यांनी स्वत:च्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेच्या वेळी दोन कर्मचारी तेथे उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील व्यावसायिक परमार यांची आत्महत्या
By admin | Updated: October 8, 2015 03:47 IST