शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

दुष्काळाऐवजी संसदीय समितीचे साईदर्शन!

By admin | Updated: April 21, 2017 03:57 IST

दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी दिल्लीहून नगरमध्ये धडकलेल्या १३ खासदारांच्या संसदीय समितीने गुरुवारी

रियाज सय्यद, कोपरगाव (जि. अहमदनगर) दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी दिल्लीहून नगरमध्ये धडकलेल्या १३ खासदारांच्या संसदीय समितीने गुरुवारी सहपरिवार केवळ साईदर्शन करण्यातच धन्यता मानली. समितीमधील एकही खासदार दुष्काळी गावाकडे फिरकला नाहीच, शिवाय आदर्श गावाच्या दिशेने पावले टाकणाऱ्या डाऊच बुद्रूककडेही त्यांनी पाठ फिरवली. समितीच्या या असंवेदनशील कारभारामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.खासदार डॉ. पी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती कोपरगाव तालुक्यात आली होती. समितीत खासदार प्रल्हाद सिंग पटेल, डॉ. यशवंत सिंग, लाडुकिशोर स्वाईन, समशेरसिंग डुल्लो, महेंद्रसिंग माहरा, शिवप्रताप शुक्ला, नारायणलाल पंचारिया, विजयकुमार हंसदक, जुगलकिशोर शर्मा, संजय धोत्रे, चिंतामण वनगा, ए. के. साल्वाराज या खासदारांसह लोकसभेचे सहसचिव अभिजित कुमार, अहवाल अधिकारी सतीश कुमार, हिमांशू गौर, व्ही. श्रीनिवासन यांचा समावेश होता. पाच खासदार सहपरिवार होते. दुष्काळी भागातील गावांमधील विकासकामांची पाहणी करून केंद्राला अहवाल सादर केला जाणार आहे. त्या अनुषंगाने समिती तालुक्यातील संवत्सर व डाऊच बुद्रूक या दोन गावांना भेटी देणार असल्याचे प्रशासनास बुधवारी रात्री कळविण्यात आले होते. समिती येणार असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही जय्यत तयारी केली होती. मात्र सर्वांचा हिरमोड झाला. शेतकरी संतापलेसमितीने गुरुवारी सकाळी ९ वाजता संवत्सर गावातील गणेश बंधारा व विहिरीची पाहणी केली. त्यानंतर पूर्व नियोजनानुसार समिती डाऊच बुद्रूकमधील कामांची पाहणी करणार होती. मात्र समितीचा लवाजमा थेट शिर्डीस गेला. सोपविलेली जबाबदारी टाळून सार्इंच्या चरणी लीन झाला. या प्रकाराने ग्रामस्थ संतापले. अधिकाऱ्यांनाही दिवसभर उन्हात ताटकळावे लागले. देवदर्शनच घ्यायचे होते, तर मग सरकारी दौऱ्याचा खर्च कशासाठी, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. महाराष्ट्रीय खासदारांना भुरळविशेष म्हणजे, संसदीय समितीत संजय धोत्रे व चिंतामण वनगा या दोन महाराष्ट्रीय खासदारांचा समावेश होता. समितीच्या दिमतीला सरकारी लवाजमा असल्याने खासदारांना देखील ‘व्हीआयपी’ दौऱ्याची भुरळ पडली होती.