शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भांडणाला कंटाळून आई-वडिलांची हत्या

By admin | Updated: March 8, 2016 03:07 IST

दररोज होणाऱ्या भांडणाने वैतागलेल्या मुलाने सोमवारी पहाटे सूर्यादय चौकात आपल्या वडिलांची चाकूने गळा कापून आणि सावत्र आईची डोक्यात वरवंटा घालून हत्या केल्याची घटना वासिंद येथे घडली.

वासिंदमधील घटना;तरुणाला अटकवासिंद/शहापूर : दररोज होणाऱ्या भांडणाने वैतागलेल्या मुलाने सोमवारी पहाटे सूर्यादय चौकात आपल्या वडिलांची चाकूने गळा कापून आणि सावत्र आईची डोक्यात वरवंटा घालून हत्या केल्याची घटना वासिंद येथे घडली. या प्रकरणी आरोपी सागर सुरेश दिनकर यास पोलिसांनी अटक केली आहे.सुरेश वामन दिनकर व लता सुरेश दिनकर अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. सुरेश यांना पहिल्या पत्नीपासून सागर आणि अजय ही दोन मुले असून, पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुरेश यांनी लता यांच्याबरोबर दुसरा विवाह केला. तिच्यापासून एक मुलगी झाली आहे. हे सर्व वासिंद येथे एकत्र राहतात. वडील आणि सावत्र आई यांच्याबरोबर मुलांचे काही ना काही कारणांवरून रोज खटके उडत होते. या भांडणाने आणि शिवीगाळीमुळे घरातील वातावरण नेहमी तप्त असायचे. तालुक्यातील बिरवाडी येथे कबड्डी स्पर्धेतून सोमवारी पहाटे परतल्यानंतर मोठा भाऊ सागर घरी गेला; तर अजय मित्रांशी गप्पा मारत बसला. सागरचे आईवडिलांशी भांडण झाले. रागाच्या भरात त्याने आईच्या डोक्यात वरवंटा घातला. त्यानंतर चाकूने वडिलांचा गळा चिरला. साधारण अर्ध्या तासाने लहान भाऊ अजय घरी आला असता त्याने आपले आईवडील दोघे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे पाहिले. यामुळे बाहेर येऊन त्याने सुरेशला काय प्रकार झाला, असे विचारले असता त्याने मी दोघांना मारून टाकले, असे सांगितले. त्यानंतर वासिंद पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.