शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

पार्सल बंद करण्याचा इशारा!, हॉटेल चालक संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 07:47 IST

पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया होणाऱ्या पार्सल कंटेनरवरच्या साठ्यावरही छापा टाकून पालिकेचे निरीक्षक कारवाई करत आहेत. ही कारवाई तत्काळ थांबवली नाही

मुंबई : पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया होणाऱ्या पार्सल कंटेनरवरच्या साठ्यावरही छापा टाकून पालिकेचे निरीक्षक कारवाई करत आहेत. ही कारवाई तत्काळ थांबवली नाही, तर हॉटेलांमधून दिले जाणारे पार्सल बंद करण्याचा इशारा ‘आहार’ या हॉटेल मालकांच्या संघटनेचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीच्या कारवाईवरून हॉटेल व्यावसायिक आणि महापालिका प्रशासन आमनेसामने उभे ठाकले आहेत. दरम्यान, नव्या कंटनेरमुळे पार्सल अन्नाचे दर वाढले आहेत.पर्यावरण विभागाच्या निर्णयानुसार एकदाच वापरण्यात येणारे आणि विघटन न होणारे प्लॅस्टिक व थर्माकॉलचे पार्सल कंटेनर हॉटेल व्यवसायिकांनी बंद केले. तसेच त्याला पर्याय म्हणून पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया शक्य असलेले प्लॅस्टिकचे कंटेनर वापरण्यास सुरूवात केली. त्यासाठी ग्राहकांकडून पार्सलमागे जादा रक्कम आकारण्यास सुरूवात केली. पुनर्वापरास योग्य कंटेनरमुळे पार्सल अन्नपदार्थांचे दर १० ते १५ रुपयांनी वाढणार असल्याचेही संघटनेने कबूल केले. पार्सल देताना इडली, चटणी, सांबार असे पदार्थ वेगवेगळ्या कंटेनरमध्ये द्यावे लागतात. त्यामुळे कंटेनरनुसार ग्राहकांना ही दरवाढ सोसावी लागेल. यातही बाय बॅक पॉलिसीनुसार ग्राहकांनी कंटेनर परत केल्यावर काही पैसे कापून उरलेले पैसे परत करण्याचा विचार आहे. येत्या १० ते १५ दिवसांत ही पॉलिसी राबवली जाईल. मात्र तोवर जितके अधिक पदार्थ असतील, तितके पार्सलसाठी अधिक पैसे ग्राहकांना मोजावे लागतील, अशी माहिती शेट्टी यांनी दिली.मात्र रविवारपासून प्लॅस्टिक निर्मूलन पथकातील निरीक्षकांनी संबंधित हॉटेल व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या चुकीच्या कारवाईमुळे मुंबईतील हॉटेल उद्योग सुमारे ३० टक्के तोट्यात गेला असून यापुढे निरीक्षकांनी दंड आकारल्यास तो न भरण्याचे आवाहन संघटनेचे सरचिटणीस विश्वपाल शेट्टी यांनी हॉटेल व्यावसायिकांना केले. प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचे स्वागत करत हॉटेलचालकांनी सर्व प्लॅस्टिकच्या पिशव्या हद्दपार केल्या. तसेच विघटन न होणाºया प्लॅस्टिकचे कंटेनरही वापरणे बंद केले. गेल्या तीन महिन्यांत विविध प्रयोग केल्यानंतर पुनर्प्रक्रिया होणारे आणि पुनर्वापरायोग्य पार्सल कंटेनर तयार करण्यात आले. नियमानुसार या कंटेनरचा पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया शक्य असल्याने त्यावर कायद्याने बंदी घालता येत नाही. मात्र रविवारी प्लॅस्टिक निर्मूलन पथकातील निरीक्षकांनी चेंबूर येथील हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई केली. त्यामुळे निरीक्षकांनाच कायद्याची जाण नसल्याचे निदर्शनास आले आल्याचा आरोपही त्यांनी केला.अधिकारी-कर्मचाºयांमध्ये समन्वयाचा अभाव?पालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट टाकून पार्सल कंटेनरवर कारवाई न करण्याचे आदेश दिले, मात्र पालिका निरीक्षक कारवाई करीत आहेत. त्यामुळे अधिकारी-कर्मचाºयांत समन्वया नसल्याचा आरोप संतोष शेट्टी यांनी केला.प्लॅस्टिकला पर्याय नाही! : अ‍ॅल्युमिनियम फॉईल, कागदी पार्सलच्या कंटेनरमध्ये द्रवरुपातील भाजी किंवा पदार्थ पार्सल करणे अशक्य असल्याचे मत ‘आहार’ने मांडले. रस्सम, सांबार, उसळ गरमच कंटेनरमध्ये भरावे लागतात. त्यामुळे अ‍ॅल्युमिनियम फॉईलमधून बाहेर पडतात, तर कागदी कंटेनर फाटतात. स्टीलच्या डब्यांत सर्वच ग्राहकांना ते देणे अशक्य आहे. पुनर्वापरायोग्य प्लॅस्टिक कंटेनरशिवाय ते पार्सल देणे शक्यच नसल्याचा दावा संघटनेने केला. पालिकेने कारवाई सुरू ठेवल्यास पार्सल बंद करण्यावाचून पर्याय नसल्याचा इशारा संघटनेने दिला....तर दंड भरू नका!लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून हॉटेल व्यावसायिकांनी पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया होणाºया पर्यावरणपूरक पार्सल कंटेनरचा वापर करण्याचे आवाहन संघटनेने केले. पर्यावरणपूरक पार्सल कंटेनर वापरल्यानंतर पालिकेच्या निरीक्षकांनी दंड आकारल्यास तो भरू नये, असेही संघटनेने सदस्यांसाठी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. कारवाईची तक्रार संघटनेच्या झोन उपाध्यक्षकांकडे करावी, असेही संघटनेने सांगितले.पालिकेच्या निरीक्षकांनी केलेल्या या कारवाईचा धसका घेत बहुतेक हॉटेल व्यवसायिकांनी पार्सल काऊंटरच बंद केला. त्यामुळे हॉटेल उद्योगाचे सुमारे ३० टक्के नुकसान झाले. यामुळे प्रशासनालाही ३० टक्के महसुलाला मुकावे लागेल.पर्यावरणपूरक या अन्नपदार्थांच्या डब्यांवर स्पष्ट शब्दांत पुनर्वापरास योग्य असल्याचा संदेश लिहिल्याचा दावा विश्वपाल शेट्टी यांनी केला. तरीही पालिका दंड आकारत असल्याने त्याला विरोध करण्याचा, प्रसंगी पार्सल बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला.