शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्तिकर अधिका-याकडे कोट्यवधीचे घबाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 05:05 IST

प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिका-यानेच कोट्यवधीचे घबाड लपवून ठेवल्याची खळबळजनक माहिती सीबीआयने शुक्रवारी दाखल केलेल्या गुन्ह्यातून समोर आली आहे

मुंबई : प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिका-यानेच कोट्यवधीचे घबाड लपवून ठेवल्याची खळबळजनक माहिती सीबीआयने शुक्रवारी दाखल केलेल्या गुन्ह्यातून समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई आयकर विभागातील टीडीएस विभागाचे अतिरिक्त आयुक्त विवेक बत्रा यांच्यासह पत्नी प्रियांका आणि अन्य तिघांवर सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. याच प्रकरणात सीबीआयने त्याच्या मुंबईसह ठाणे, गोवा, सिल्व्हासा आणि दिल्ली येथील १० ठिकाणांवरील घर, कार्यालयांवर छापे टाकले.विवेक बत्रा हे १९९२ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ते सध्या आयकर विभागाच्या टीडीएसचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. कामाच्या कालावधीत त्यांनी बेनामी मालमत्ता बाळगल्याबाबत सीबीआयकडे तक्रार आली होती. १ एप्रिल २००८ ते ३० एप्रिल २०१७ दरम्यान त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केली. सीबीआयने अधिक चौकशी सुरू केली तेव्हा तपासात बत्रा यांच्या उत्पन्नापेक्षा बेनामी स्थावर तसेच जंगम मालमत्ता अधिक आढळून आली. ही मालमत्ता त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या नावावर आहे. त्यामुळे पत्नीही सहआरोपी आहे. बत्रा यांच्याकडे एकूण ६ कोटी ७९ लाख ५१ हजार ११६ रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आढळून आली. मात्र, एवढी मालमत्ता कशी व कोठून आली याबाबत ते स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यामुळे सीबीआयने बत्रा, त्यांच्या पत्नी प्रियांका, सीए शिरीष शहा, विराज प्रोफाइल लिमिटेडचे एमडी नीरज कुमार, अलोक इंडस्ट्रिजचे संचालक दिलीप जिवारजीका यांच्याविरुद्ध् बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.