शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

प. रेल्वेवर नव्या फे-या नाहीत

By admin | Updated: July 18, 2014 03:07 IST

रेल्वे अर्थसंकल्पात जुनेच प्रकल्प उपनगरीय लोकल प्रवाशांच्या माथी मारण्याचे काम रेल्वेने केलेले असतानाच आता आणखी एक संकट पश्चिम रेल्वे प्रवाशांवर ओढवले आहे

मुंबई : रेल्वे अर्थसंकल्पात जुनेच प्रकल्प उपनगरीय लोकल प्रवाशांच्या माथी मारण्याचे काम रेल्वेने केलेले असतानाच आता आणखी एक संकट पश्चिम रेल्वे प्रवाशांवर ओढवले आहे. यापूर्वीच भरमसाठ वाढलेल्या लोकल फेऱ्या आणि आणखी फेऱ्या चालवण्यासाठी नसलेली क्षमता पाहता यापुढे नवीन लोकल फेऱ्या वाढवणे अशक्य असल्याचे पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी सांगितले. त्यामुळे नवीन फेऱ्यांसाठी पश्चिम रेल्वे प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे. पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी गुरुवारी रेल्वे अर्थसंकल्प आणि पश्चिम रेल्वेवर येणाऱ्या तसेच सुरू असणाऱ्या प्रकल्पांविषयी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही माहिती समोर आणली. मागील सहा वर्षांत पश्चिम रेल्वेमार्गावर ९ डब्यांच्या लोकल १२ डब्यांच्या करण्यात आल्या. तसेच १२ डब्यांच्या लोकल आता १५ डबाही करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्येक गाडीची प्रवासी क्षमता ३३ टक्क्यांनी वाढली असून, गर्दीतला प्रवास कमी झालेला आहे. सध्या पश्चिम रेल्वेमार्गावर लोकलच्या १,३00 फेऱ्या होत असून, या फेऱ्यांमध्ये येत्या काळात आणखी वाढ होणे अशक्य आहे. लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याची माहिती त्यांनी दिली. पाच मिनिटांच्या फरकाने सध्या ९२ ते ९३ टक्के लोकल धावत असून, हे पाहता फेऱ्या वाढवणार कशा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हार्बर रेल्वेचा विस्तार गोरेगावपर्यंत झाल्यावर सुसूत्रता येईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)