शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प. महाराष्ट्रातील नेत्यांचे ‘गाव चलो’ अभियान

By admin | Updated: September 14, 2014 00:36 IST

विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. प्रत्येक मतदाराचे महत्त्व लक्षात घेऊन गावाकडील नेत्यांनी आता मुंबईतील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

नामदेव मोरे - नवी मुंबई
विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. प्रत्येक मतदाराचे महत्त्व लक्षात घेऊन गावाकडील नेत्यांनी आता मुंबईतील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये मेळावे घेतले जात असून जन्मभूमीच्या विकासासाठी मतदानास गावी येण्याचे आवाहन केले जात आहे.
विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून राज्यात एकाच दिवशी मतदान होणार आहे. यामुळे आतार्पयत गावी मतदान करायचे व नंतर शाई पुसून पुन्हा मुंबईत मतदान करता येणार नाही. यामुळे  मुंबई व ग्रामीण भागातील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. ग्रामीण भागातील विशेषत: सातारा, पुणो जिल्ह्यातील नेत्यांनी एकाच दिवशी मतदानाची शक्यता गृहीत धरून यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जुलैपासूनच मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. सातारा-जावी मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुंबई व नवी मुंबईमध्ये तीन मेळावे घेऊन चाकरमान्यांना गावी येण्याचे आवाहन केले आहे. जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे) शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघातील रहिवाशांचा मेळावा घेतला. डॉ. अतुल भोसले यांनी  कराड दक्षीत मतदारसंघातील रहिवाशांचा नवी मुंबईमधील माथाडी भवनमध्ये मेळावा आयोजित केला होता. सातारा जिल्ह्यातील चुरशीची लढत होणा:या माण-खटाव मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व येथील इच्छुक उमेदवार अनिल देसाई यांनीही कळंबोलीमध्ये मेळावा घेऊन मतदारांना गावी येण्याचे आवाहन केले. पुणो जिल्ह्यातील जुन्नर, खेड व आंबेगावमधील रहिवाशांचा मेळावा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत केला होता. चाकरमान्यांना कोणत्याही स्थितीत मतदानासाठी गावी घेऊन जाण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. याचा फटका मुंबई व नवी मुंबईमधील उमेदवारांना बसणार आहे.
 
च्या निवडणुकीत मुंबईतील चाकरमान्यांचे महत्त्व वाढले आहे. चाकरमानी गावी आले की एकगठ्ठा मतदान होते. कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा मोठा प्रभाव पडतो. यामुळे यावेळी चाकरमान्यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
मुंबई, नवी मुंबईतील नेत्यांची डोकेदुखी वाढली 
ग्रामीण भागातील नेत्यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. चाकरमान्यांना भावनिक साद घातली जात आहे. यामुळे हजारो चाकरमानी मतदानासाठी गावी जाणार हे निश्चित झाले आहे. यामुळे मुंबई व नवी मुंबईतील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. मतदारांचे स्थलांतर थांबविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.