पेण : स्वच्छ भारत अभियानाच्या उदिष्ट पुर्ततेसाठी पेण पालिका प्रशासनाने स्वच्छ शहर, सुंदर शहर अभियान सुरू केले. यासाठी आज पेण पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी प्रल्हास रोडे यांच्या पुढाकाराखाली पेण नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासनाचे तब्बल 8क् कर्मचारी व स्वच्छता विभागाचे 6क् कर्मचारी असे एकूण 14क् अधिकारी व कर्मचारी पेण नगर प्रशासनाचे शाळांचे शिक्षकवर्ग व विद्यार्थी वर्गाकडून शुक्रवारी सकाळी स्वच्छता अभियान रॅली काढून साई मंदिर परिसराजवळील कासार तलावाची स्वच्छता करण्यात आली.
पेण नगर पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात स्वच्छ परिसर अभियानास आजपासून प्रारंभ झाला. पालिकेच्या स्वच्छता अभियानात मुख्याधिकारी प्रल्हाद रोडे, किरण शाह, आरोग्य अधिकारी दयानंद गांवड, शिवाजी चव्हाण, जागृती पवार, जर्नादर भोयर, रमेश देशमुख, शेखर अभंग, नरेंद्र पाटील, या प्रमुख अधिकारी वर्गासह, कम्रचारी, शालेय विद्यार्थी, शिक्षक यांनी स्वच्छतेसाठी हातात झाडू घेवून कचरा गोळा केला. कासार तलावात o्री साई मंदिर असल्याने या ठिकाणचे तलावात टाकण्यात येणारे निर्माल्याचा कचराही पालिका कर्मचा:यांनी तलावात उतरुन स्वच्छ केला. या तलावाच्या ठिकाणी पेणचे समस्त नागरिक सकाळ,संध्याकाळ फेरफटका तथा मॉर्निगवॉकसाठी येत असल्याने स्वच्छ परिसर व मंदिराचे पावित्र्य टिकावे यासाठी पालिका प्रशासनाने तब्बल 8क् कर्मचारी व विद्यार्थीवर्गाने मिळून हा तलावाचा परिसर स्वच्छ केला.
प्रारंभी नगर पालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे नगर पालिका शाळांचे विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छता रॅली काढून नागरिकांना स्वच्छ परिसर ठेवण्यासाठी स्वच्छ शहर, सुंदर शहर, आरोग्यदायी शहराच्या घोषणा दिल्या, विद्यार्थी व शिक्षकाच्या या प्रभातफेरीत पालिका कर्मचारीही सहभागी झाले होते. नगर परिषद इमारतीपासून प्रारंभ झालेली रॅली कासार तळय़ावर येवून रॅलीतील सर्वानी 2क् जणांचे पथक मिळून 1क् ग्रुपमध्ये तलाव परिसरासह तलावातील निर्माल्यांचा कचरा काढून परिसर स्वच्छ केला. (वार्ताहर)