शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या महापौरपदी कविता चौतमोल बिनविरोध

By admin | Updated: July 11, 2017 03:31 IST

पनवेल शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदावर डॉ. कविता चौतमोल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदावर डॉ. कविता चौतमोल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, तर उपमहापौरपदी चारुशीला घरत यांची घोषणा पीठासन अधिकाऱ्यांनी केली. पनवेल महापालिकेच्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडलेल्या पहिल्या विशेष महासभेत ही घोषणा करण्यात आली. शेकापच्या महापौरपदाच्या उमेदवार हेमलता गोवारी व उपमहापौरपदाचे उमेदवार रवींद्र भगत यांनी उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. रायगडचे जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. स्थायी समिती व स्वीकृत सदस्यांची घोषणाही सभागृहात करण्यात आली. भाजपाच्या वतीने तीन जणांचे अर्ज स्वीकृत नगरसेवक पदासाठी दाखल करण्यात आले होते. यामध्ये माजी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, विजय चिखलेकर यांचा समावेश होता. तिघांचेही अर्ज पात्र झाल्याने तिघांच्या गळ्यात स्वीकृत नगरसेवक पदाची माळ पडली तर शेकापच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये गुरुनाथ गायकर, बाळाराम पाटील, प्रमोद भगत, गणेश कडू यांचा समावेश होता. मात्र चारपैकी दोन जागेवर स्वीकृत नगरसेवक निवडता येणार होते. पैकी बाळाराम पाटील यांचा अर्ज अपात्र ठरल्याने तीन जणांमध्ये पक्षांतर्गत लढाई होती. शेकाप गटनेते प्रीतम म्हात्रे यांनी अखेर दोन नावे पीठासन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्याने गुरुनाथ गायकर व प्रमोद भगत यांची निवड करण्यात आली. पालिकेच्या एकूण ७८ नगरसेवकांपैकी भाजपाचे ५१ तर शेकाप महाआघाडीचे २३ नगरसेवक निवडून आले आहेत. यापैकी भाजपाचे सर्व ५१ जण सभागृहात उपस्थित होते, तर शेकापच्या २३ पैकी अरविंद म्हात्रे या वेळी अनुपस्थित होते. ७८ नगरसेवकांच्या आकडेवारीनुसार १६ सदस्य स्थायी समितीवर जाणार होते. त्यापैकी पक्षीय बलाबल पाहत भाजपाचे १० तर शेकापचे ६ सदस्य स्थायी समितीवर नेमण्यात आले. पीठासन अधिकारी पी. डी. मलिकनेर, उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले.पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाचा पदभार स्वीकारताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना श्रेय देत आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करेन. सर्व निर्वाचित नगरसेवकांनी पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे. - डॉ. कविता चौतमोलपनवेल शहर महानगरपालिका १ आॅक्टोबर २०१६ रोजी अस्तित्वात आली. महापालिकेची ही पहिलीच ऐतिहासिक महासभा असून महापौर यांच्यावर महापालिका क्षेत्रातील नागरिक त्यांच्या समस्या, परिसराच्या विकासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यात पनवेलला अव्वल बनविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. - परेश ठाकूर, भाजपा गटनेते स्वीकृत सदस्य भाजपा : नितीन पाटील, अनिल भगत, विजय चिखलेकर शेकाप : गुरु नाथ गायकर, प्रमोद भगत स्थायी समिती सदस्य भाजपा : परेश ठाकूर, संतोष भोईर, नेत्रा पाटील, रामजी गेला बेरा, अमर पाटील, गोपीनाथ भगत, कुसुम म्हात्रे, मनोहर म्हात्रे, संजय भोपी, तेजस कांडपिळे. शेकाप आघाडी : प्रीतम म्हात्रे, सुरेखा मोहोकर, भारती चौधरी, हरेश केणी, गोपाळ भगत, रूपेश पाटील.