शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल आरटीओने रसायनीत शोधली जागा

By admin | Updated: April 8, 2017 03:37 IST

पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी सिडकोने करंजाडे या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे.

अरूणकुमार मेहत्रे,कळंबोली- स्टील मार्केटमध्ये भाडोत्री जागेवर असलेले पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी सिडकोने करंजाडे या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र हा भूखंड अपुरा पडत असल्याने परिवहन विभागाने रसायनी येथे जागा शोधली आहे. त्याचबरोबर पनवेल तालुक्यातही शासकीय जागेचा शोध सुरू आहे. सर्व सुविधा निर्माण करण्याकरिता कमीत कमी तेरा एकर जागेची आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पनवेल परिसराचा वाढता विस्तारामुळे ठाणे परिवहन आणि पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर ताण पडत होता. स्थानिकांच्या मागणीनुसार राज्य परिवहन विभागाने नोव्हेंबर २०१० मध्ये ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे विभाजन करून पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू केले. त्याचबरोबर पेण कार्यालयावरील ताण कमी करण्याकरिता पनवेल, कर्जत, खालापूर या तालुक्यांकरिता पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आहे. सुरुवातीला कर्नाळा स्पोटर््स अकादमी संकुलात कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र वाढती गर्दी पाहता एक कॅम्प अकादमी परिसरात ठेवून कळंबोली स्टील मार्केटमध्ये कार्यालय हलविण्यात आले. अवजड वाहनांच्या गर्दीमुळे याठिकाणचीही जागा अपुरी पडू लागली. सर्वात मोठी अडचण म्हणजे चालकांची चाचणी घेण्याकरिता आणि वाहनांची तपासणीसाठी स्टील मार्केटमध्ये जागाच नाही. म्हणून पनवेल आरटीओ कार्यालयाला हक्काची आणि विस्तीर्ण जागा असावी याकरिता सहा सात वर्षापासून परिवहन विभागाकडून सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर सिडकोने सकारात्मक भूमिका घेत करंजाडे येथे २३,७६३ चौरस मीटरचा भूखंड आरटीओ कार्यालयाला दिला आहे. २.५ हेक्टर क्षेत्रावर ३,५९० चौमी जागेवर बांधकाम करण्याचा प्रस्ताव आहे. तळमजला अधिक चार अशी इमारत या ठिकाणी उभारण्यात नियोजन आहे. परंतु वाहनांची तपासणी त्याचबरोबर चालकांना प्रशिक्षण देण्याकरिता ट्रेकिंग ट्रॅक उभारण्यासाठी हा भूखंड अपुरा पडत असल्याने परिवहन विभाग पनवेल परिसरात दुसरी जागा शोधत आहे. मात्र अपेक्षित जागा मिळणे कठीण झाल्याने रसायनी विभागात जागा शोधली आहे.वाया गावात शासकीय जागारसायनीजवळ वाया गावात पंचवीस एकर एकसंघ शासकीय जागा आहे. त्यापैकी तेरा एकर जागेची परिवहन विभागाने मागणी केली आहे. त्यासाठी ग्रामसभेच्या ठरावाची आवश्यकता आहे. मात्र ग्रामस्थांनी आगोदर आमचे गावठाण निश्चित करा, अशी भूमिका घेतली आहे.सिडकोने करंजाडे येथे जो भूखंड दिला आहे ते क्षेत्रफळ कमी पडत आहे. कमीत कमी तेरा एकर जागेची गरज आहे. त्यानुसार रसायनीतील वाया गावात जागा सुध्दा शोधली आहे. मात्र अजूनही पनवेल परिसरात भूखंड मिळावा, या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहेत. - अनंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल२५० मीटरचा ट्रेकिंग ट्रॅकपनवेल आरटीओ वाहनांची चाचणी, प्रशिक्षण घेण्याकरीता २५० मीटर लांबीचा ट्रेकिंग ट्रॅक तयार करणार आहे. त्यामुळे करंजाडे येथील भूखंड तुलनेत कमी पडत आहे. वाहनांची पार्किंग तसेच ते वळविण्यासाठी मुबलक जागा आवश्यक आहे. त्यामुळे परिवहन विभाग मोठी जागा शोधत आहे.