शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल-चिपळूण डेमू ट्रेन

By admin | Updated: August 10, 2015 01:18 IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहता पनवेल-चिपळूण या मार्गावर डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहता पनवेल-चिपळूण या मार्गावर डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. ही ट्रेन ८ सप्टेंबरपासून सोडली जाणार असून, तिच्या ३६ फेऱ्या होणार आहेत. ही ट्रेन पनवेल स्थानकातून सकाळी ११.१0 वाजता सुटेल आणि चिपळूणमध्ये सायंकाळी ४ वाजता दाखल होईल; तर पुन्हा चिपळूणमधून साडे पाच वाजता सुटून पनवेल स्थानकात रात्री साडे दहा वाजता दाखल होईल. मात्र ही ट्रेन पॅसेंजर म्हणून चालवणार की आरक्षित याबाबत अद्याप निर्णय झाला नसून त्यामुळेच तिचे भाडेही निश्चित झाले नसल्याचे सांगण्यात आले. कोकणासाठी सध्या नियमित ट्रेन धावतच आहेत. गणेशोत्सवासाठी दर वर्षी जादा ट्रेन सोडण्यात येतात. मागील वर्षी २१४ जादा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. यंदाही त्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे. कोकणात खेड आणि चिपळूणपर्यंत जाणारे प्रवासी पाहता त्यांना रेल्वेने प्रवास करताना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो. या प्रवाशांना या डेमू ट्रेनमुळे दिलासा मिळणार आहे.