शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये अ‍ॅट्रॉसिटी बचावासाठी महामोर्चा

By admin | Updated: November 4, 2016 07:44 IST

अनुसूचित जाती जमाती तसेच इतर समाजाच्या मंडळांच्या उपस्थितीत व महिलांच्या साथीने करण्यात आले होते

पनवेल : अ‍ॅट्रॉसिटी बचाव महामोर्चाचे आयोजन गुरुवार, ३ नोव्हेंबर रोजी नवीन पनवेल आदई सर्कलपासून ते पनवेल प्रांत कार्यालयापर्यंत बहुसंख्येने अनुसूचित जाती जमाती तसेच इतर समाजाच्या मंडळांच्या उपस्थितीत व महिलांच्या साथीने करण्यात आले होते. अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक बळकट करण्यात यावा, या कायद्यांतर्गत खटल्यांचा सहा महिन्यांत निकाल काढण्यात यावा, दलित व आदिवासी यांना शस्त्र परवाने देण्यात यावेत, आदिवासींचे कुपोषण ताबडतोब थांबवावेत, पोलिसांवर हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांसाठी अ‍ॅट्रॉसिटी बचाव महामोर्चाचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले होते.हा मोर्चा अभ्युदय बँक, नवीन पनवेल ते आदई सर्कल ते एचडीएफसी सर्कल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पनवेल ते शिवाजी चौक ते जुना तहसील ते प्रांत कार्यालय असा काढण्यात आला. या महामोर्चात सुभाष गायकवाड, नरेंद्र गायकवाड, बी.पी. लांडगे, संजय गायकवाड, संजय सोनावणे, मोहन डाकी, एकनाथ खापरे, संतोष कीर्तीकर, धनाजी वाहूरकर, बाळू भालेकर, शोभा जाधव, रमाताई अहिरे, विशाखा इंगोले आदींसह मोठ्या प्रमाणात बहुजन समाज सहभागी झाला होता. या मोर्चाच्या सांगतेच्यावेळी चिमुरडी संस्कृती चंदने हिने भाषण केले. त्याचप्रमाणे उपस्थित विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा या महामोर्चात मार्गदर्शन केले. पनवेलसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड येथून हजारोंच्या संख्येत बहुजन व इतर समाजसमूह भीमसैनिक उपस्थित होता.