शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

पेंधर उड्डाणपुलाचे नियोजन फसले

By admin | Updated: June 28, 2016 02:08 IST

पेंधर येथे खारघर-तळोजा (फेज २) या दरम्यान मुंब्रा-पनवेल महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे सिडकोचे नियोजन पुरते फसले आहे

वैभव गायकर,

पनवेल - पेंधर येथे खारघर-तळोजा (फेज २) या दरम्यान मुंब्रा-पनवेल महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे सिडकोचे नियोजन पुरते फसले आहे. पुलाचे काम सुरू असलेली जागा असंपादित असून संबंधित जमीन मालकाची कोणतीही परवानगी न घेता सिडकोने तेथे उड्डाणपुलाचे काम सुरू केले आहे. परंतु संबंधित भूधारकाने त्याला थेट न्यायालयात आव्हान दिल्याने या पुलाचे काम मागील चार वर्षांपासून रखडले आहे. मौजे पेंधर याठिकाणी शेतकरी अजिज पटेल यांची जवळजवळ दीड एकर जागा आहे. ही जागा संपादनातून वगळण्यात आल्याचा उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या २००७ राजपत्रात आहे. तरी देखील सिडकोने याठिकाणी उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू केले. २०१२ साली या कामाला सुरुवात झाली, मात्र शेतकऱ्याने अडथळा घातल्यानंतर हे काम थांबले आहे. खारघर शहर व तळोजा फेज २ला जोडणाऱ्या पुलामुळे दोन्ही शहरामधील अंतर कमी होणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक रहिवाशांना याचा फायदा होणार आहे. मुंब्रा-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा असते. या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम देखील रखडल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. तसेच तळोजा फेज २मध्ये औद्योगिक वसाहत असल्यामुळे नोकरदारवर्गाला या नव्या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. तळोजामध्ये वाहतूक कोंडीची समस्या जटील आहे. हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर खारघर शहरामधील सर्व वाहतूक नव्या खारघर - तळोजा फेज २ मार्गावर वळेल. मात्र चार वर्षांपासून हे काम रखडल्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आव्हान सिडकोसमोर आहे. विशेष म्हणजे अजिज पटेल या शेतकऱ्याला याच जागेवर २५ फेब्रुवारी २०११ ला भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप मंजूर झाला आहे. मात्र सिडकोच्या अडथळ्यामुळे शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून ना हरकत दाखला मिळत नसल्याची खंत पटेल यांनी व्यक्त केली आहे. ^‘आमची जागा आम्ही सिडकोला देणार नाही. खासगी जागा असताना सिडकोने आम्हाला विचारले देखील नाही. २०१५ साली सिडकोने आम्हाला या जागेसंबंधी बैठकीकरिता बोलावले. संबंधित जागेचा २२.५ टक्के मोबदला देण्याचे आमिष आम्हाला दाखविले, मात्र आम्हाला १०० टक्के जागा हवी,’ असे पटेल यांनी सिडकोला बजावले. मात्र तेव्हापासून सिडकोच्या वतीने आम्हाला काहीच माहिती देण्यात आलेली नाही. सध्या अजिज पटेल हे याठिकाणी साहिल नावाचा ढाबा चालवत आहेत. सिडकोचे प्रयत्न सुरूअजिज पटेल या शेतकऱ्याच्या अडथळ्यासोबत खारफुटीचा विषय देखील या कामाला अडथळा ठरला आहे. आम्ही यासाठी शेतकऱ्याशी दोन वेळा बैठक देखील केली आहे. दोन्ही प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून लवकरात लवकर हा प्रश्न सोडविला जाईल, अशी प्रतिक्रिया सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली. सिडकोने याठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्याला विश्वासात घ्यायला हवे होते. या मार्गावर आजवर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. दररोज ही मालिका सुरूच आहे. स्थानिक ग्रामस्थांना त्याचा मोठा फटका बसत आहे. शहराचे शिल्पकार समजल्या जाणाऱ्या सिडकोचे हेच का नियोजन, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी दिली.