शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाचपुते प्रकरणाकडे कानाडोळा

By admin | Updated: August 10, 2014 02:22 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत असलेली घुसमट, यामुळे नाराज झालेले माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे निश्चित केले.

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत असलेली घुसमट, यामुळे नाराज झालेले माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे निश्चित केले. त्यावर जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी त्यांची समजूत काढत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोर्टात हा विषय काढण्याचे आश्वासन दिले. शनिवारच्या पुणो भेटीत खुद्द पवार यांनीच अभंग यांना या विषयांवर नंतर बोलू’ असे सांगत पाचपुते प्रकरणाकडे सपशेल कानाडोळा केला. पाचपुते आता काय भूमिका घेतात याची उत्सुकता कार्यकत्र्याना आहे. 
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवानंतर दक्षिण जिलतील राजकारण ढवळून निघाले. पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या संशयावरून पक्षातून आ. पाचपुते यांची कोंडी करण्यात आल्याची चर्चा आहे. यावरून नाराज झालेले पाचपुते थेट पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. कार्यकत्र्याना याची मानसिकता तयार करून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे.  दरम्यान, पाचपुते यांच्या संभाव्य बंडाबाबत पक्षातून एकाही नेत्याने जाहीरपणो दखल घेतलेली नाही. पक्षीय पातळीवर असणा:या शांततेमुळे पाचपुते सध्यातरी एकाकी पडल्याचे चित्र आहे. 
श्रीगोंदा तालुक्यातील सर्वच विरोधकांकडून पाचपुते यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत असून, ते पक्षाला इमोशनल ब्लॅकमेल करीत आहेत. त्यांचा नाराजीनामा हा त्यांचा नौटंकीपणा आहे. साईकृपा कारखान्याला कर्ज दिले नसल्याच्या नावाखाली सत्तेची खुर्ची टिकविण्यासाठी त्यांची धडपड आहे. बारामतीसारखा विकास करण्याचे स्वप्न दाखविणा:या पाचपुते यांनी विकासाच्या घोषणांचा पाऊस पाडला. मात्र तालुका विकासाऐवजी भकास केल्याचा आरोप जनसेवा विकास मंडळाचे अध्यक्ष घनशाम शेलार यांनी केला आहे. नाराजीनाम्यानंतरही पक्षाकडून दखल घेतली गेली नसल्याने पाचपुते अजूनही शांत आहेत. त्यांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही अथवा निर्णय जाहीर केलेला नाही. यामुळे पक्षासह पाचपुते यांनीही आपले पत्ते बंद ठेवले आहेत.
 
पुण्यात शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात आपण आ. बबनराव पाचपुते प्रकरण  त्यांच्या कानावर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी पवार यांनी या विषयांवर 15 तारखेनंतर सविस्तर चर्चा करू असे स्पष्टपणो सांगितले.    
- पांडुरंग अभंग, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस