शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे झाले : भरपाई कधी?

By admin | Updated: May 10, 2014 20:39 IST

धामणी (ता. आंबेगाव) येथे मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे फार मोठे नुकसान झाले,

लोणी-धामणी : धामणी (ता. आंबेगाव) येथे मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे फार मोठे नुकसान झाले, त्याचे पंचनामेसुद्धा झाले; पण आजपर्यंत एक पैसाही नुकसान म्हणून मिळाला नाही. येत्या आठ दिवसांत जर नुकसानभरपाईचे पैसे मिळाले नाही, तर येथील तलाठी कार्यालयासमोर शेतकरी लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती उपसरपंच अंकुश भूमकर यांनी दिली आहे. मागील मार्च-एप्रिल महिन्यात धामणी व परिसरातील वाड्या-वस्त्या, मळे येथे गारपिटीचा व अवकाळी पावसाचा फार मोठा तडाखा बसल्याने येथील शेतकर्‍यांच्या शेतातील कांदा, गहू, कलिंगड, फळबागा व तरकारी पिकांना फार मोठा फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत प्रशासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, अद्याप मदत मिळालेली नाही. वाळुंजनगर (ता.आंबेगाव) येथे मार्च व एप्रिलमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान झाले; पण नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे कृषी विभाग, तलाठी व ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे पंचनामेच झाले नाहीत, अशी तक्रार येथील सरपंच उषा वाळुंज व उपसरपंच महेंद्र वाळुंज व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे. येथील उपसरपंच म्हणाले की, आम्ही गारपीट व अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करा, असे येथील कृषी पर्यवेक्षक, तलाठी व ग्रामसेवकाला सांगितले; पण त्यांनी आम्हाला वाळुंजनगर येथील शेतकर्‍यांच्या पंचनाम्यासंदर्भात आदेश नाही, अशी टोलवा-टोलवीची उत्तरे दिली.