शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंच्या संघर्ष यात्रेची चौकशी

By admin | Updated: September 14, 2014 01:44 IST

आमदार पंकजा मुंडे यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग झाल्याची शक्यता व्यक्त करीत दौ:याची माहिती मागविली आहे.

नाशिक : राज्यात सत्तापरिवर्तनाच्या हेतूने भाजपा नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग झाल्याची शक्यता व्यक्त करीत, जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून मुंडे यांच्या दौ:याची माहिती मागविली आहे.
पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेचे शुक्रवारी जिलत आगमन झाले, त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा काहीच अडसर नव्हता, मात्र साडेचार वाजता निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा व आचारसंहिता लागू केल्यानंतर मुंडे यांची संघर्ष यात्र पुढे सुरू ठेवावी किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त करण्यात आली. दुपारी साडेचार वाजेर्पयत संघर्ष यात्रेविषयी फारसे गांभीर्याने घेण्यासारखे काहीच नसले तरी त्यानंतर मात्र सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान संघर्ष यात्र लासलगावला पोहोचल्यावर भाजपा कार्यकत्र्यानी ङोंडे, पताका व जोरदार राजकीय घोषणाबाजी करून वातावरण निर्मिती केली. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी राजकीय भाषणही ठोकले. त्यानंतर नाशिक येथे आडगाव नाक्यावर या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले व तेथून भाजपाचे ध्वज व निवडणूक चिन्ह असलेली मोटारसायकल रॅलीही शहरातून काढण्यात आली. संघर्ष यात्रेची रीतसर परवानगी भाजपाने पोलिसांकडून घेतली असली तरी ती आचारसंहिता लागू होण्यापूर्वी असल्याने पोलिसांनी या यात्रेच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या अंगानेच अनुमती दिली होती; परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतरही यात्रेच्या माध्यमातून राजकीय प्रदर्शन आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा अर्थ  काढला जात आहे. 
 
चौकशीचा ससेमिरा..
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तत्काळ शहरातील राजकीय पक्षांचे फलक, बॅनर्स, ङोंडे काढण्यात येऊन जाहीर राजकीय कार्यक्रमांना त्या त्या मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिका:यांकडून अनुमती घेण्याचा दंडक असताना मुंडे यांच्या आचारसंहितेनंतरच्या राजकीय कार्यक्रमांना अनुमती होती किंवा कसे तसेच या कार्यक्रमांची निवडणूक भरारी पथकाने व व्हिडीओ पथकाने दखल घेतली काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
दुपारी साडेचार वाजता निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांनी विशेष करून त्याचे पालन करणो आवश्यक आहे. पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेचे स्वागत, शहरात लावलेले फलक, बॅनर व ङोंडे तसेच जाहीर सभा यासाठी परवानगी घेतली होती किंवा नाही याची खातरजमा केली जाईल व निवडणूक अधिकारी म्हणून स्वत:हून या घटनेची चौकशी करून प्रसंगी कारवाई करू.
- गणोश राठोड, तहसीलदार