शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंना अधिवेशनात काम करू देणार नाही

By admin | Updated: July 2, 2015 00:42 IST

महिला व बालविकास मंत्रालयातील २०६ कोटी रूपयांच्या भ्रष्टाचारासंदर्भात पंकजा मुंडे यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक व जनतेच्या मनातील शंका-कुशंकांचे निराकरण

मुंबई : महिला व बालविकास मंत्रालयातील २०६ कोटी रूपयांच्या भ्रष्टाचारासंदर्भात पंकजा मुंडे यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक व जनतेच्या मनातील शंका-कुशंकांचे निराकरण करणारे नसल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. अन्यथा पावसाळी अधिवेशनात पंकजा मुंडेंना कामकाज करू दिले जाणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.गांधी भवन या काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विखे-पाटील आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत बोलत होते. यावेळी विखे-पाटील म्हणाले की, ठोस पुराव्यांसह तक्रार केल्यानंतर पंकजा मुंडे यांचा राजीनामा घेऊन या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू होईल, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. पंकजा मुंडेंनी केलेले खुलासे धादांत खोटे आणि जनतेची दिशाभूल करणारे आहेत. त्यांची आजची पत्रकार परिषद वस्तुस्थिती समोर आणणारी नव्हे तर त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणारी होती. अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देणे त्यांनी टाळले, अशी टीका सावंत यांनी केली. इ-टेंडरींग करण्यासाठी सरकारकडे पुरेसा कालावधी उपलब्ध होता. तरीही विशिष्ट ठेकेदारांना फायदा मिळवून देण्यासाठी निविदा प्रक्रिया जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा आरोप सावंत यांनी केला. तसेच आपल्या चुकीचे समर्थन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ई-निविदेबाबत कधीही वक्तव्य केलेले नाही, ही पंकजा मुंडे यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचेही सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)