वैजापूर (औरंगाबाद): महालगाव येथे शनिवारी सायंकाळी भाजपाच्या सभेत स्टेज कोसळल्याने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्या पायाला किरकोळ जखम झाली.महालगाव येथे भाजपातर्फे पंकजा मुंडे यांची सभा शनिवारी आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या स्टेजवर आल्या व पाठोपाठ ५० ते ६० कार्यकर्ते मोठा हार घेऊन त्यांचे स्वागत करण्यासाठी स्टेजवर आल्यानंतर स्टेज कोसळले. डॉ. भागवत कराड व काही महिला कार्यकर्त्यांनी तातडीने मुंडे यांच्याकडे धाव घेऊन त्यांना सावरले. यात त्यांच्या पायाला किरकोळ जखम झाली. हा गोंधळ शांत झाल्यावर काही वेळातच स्टेजच्या बाजूला कार्यक्रम सुरू करण्यात आला. पंकजा मुंडे यांनी तेथूनच भाषण केले.(प्रतिनिधी)
सभेत स्टेज कोसळल्याने पंकजा मुंडे किरकोळ जखमी
By admin | Updated: January 29, 2017 01:04 IST