शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे लोकसभा तर यशश्री मुंडे विधानसभा लढवणार ?

By admin | Updated: June 10, 2014 15:11 IST

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे - पालवे यांना तर यशश्री मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १० -  भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे - पालवे या निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पंकजा यांना केंद्रात राज्यमंत्री पद देण्यात येईल अशी चिन्हे असून गोपीनाथ मुंडे यांची कनिष्ठ कन्या यशश्री मुंडे यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची  तयारीही भाजप नेत्यांनी सुरु केली आहे. 
गोपीनाथ मुंडे यांचे गेल्या आठवड्यात दिल्लीत कार अपघातात निधन झाले. मुंडे यांच्या अकाली निधनाने राज्यात भाजपला मोठा हादरा बसला आहे. मुंडेच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवार पुढील सहा महिन्यात निवडणूक लढवणे आवश्यक आहे. मुंडे यांच्यानंतर त्यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे - पालवे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे या सध्या परळी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. पंकजा लोकसभेत गेल्यास परळीतून मुंडेंची कनिष्ठ कन्या यशश्री मुंडे यांना विधानसभेचे तिकीट दिले जाईल असे समजते. राज्यातील भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी या निर्णयावर सहमती दर्शवल्याचे समजते. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याला पाठिंबा दर्शवला आहे.  २२ जूननंतर या सर्व निर्णयांवर वरिष्ठ पातळीवरुन शिक्कामोर्तब केले जाईल असे सूत्रांनी सांगितले.
मुंडेंच्या निधनाची सीबीआय चौकशी करा
गोपीनाथ मुंडे यांच्या कार अपघातावर संशय व्यक्त केला गेला होता. मुंडेंच्या अंत्यसंस्काराच्या वेळी परळीतील मुंडे समर्थकांनीही या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. मंगळवारी राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन मुंडेच्या अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली. यापूर्वी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनीही मुंडेच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता गृहमंत्री राजनाथ सिंह याविषयी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.