शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाला न्याय देणार- पंकजा मुंडे

By admin | Updated: May 31, 2016 16:24 IST

राज्य सरकार धनगर समाजाला सत्तेत न्याय मिळवून देईल. आरक्षणाच्या मुद्द्यावर समस्त धनगर समाज एकत्र राहील.

ऑनलाइन लोकमतअहमदनगर (चौंडी), दि. 31-  राज्य सरकार धनगर समाजाला सत्तेत न्याय मिळवून देईल. आरक्षणाच्या मुद्द्यावर समस्त धनगर समाज एकत्र राहील. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडी या त्यांच्या जन्मगावातच दरवर्षी साजरी होईल. विकासासाठी चौंडी गाव दत्तक घेतले आहे, अशी घोषणा ग्रामिणविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी (ता. जामखेड) येथे मंगळवारी मेळावा झाला. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर मेळावा घेवून चौंडीकडे पाठ फिरविली. या पार्श्वभूमीवर चौंडी येथील मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जयंती मेळाव्यास धनगर समाजातील सहा आमदारांसह विविध पक्षाचे ११ आमदार उपस्थित होते. राजस्थानच्या मुंख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे या मेळाव्याला येऊ शकल्या नाहीत. त्याऐवजी राजस्थानचे उद्योगमंत्री गजेंद्रसिंह यांनी या मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्य सरकार धनगर समाजाला सत्तेत न्याय मिळवून देईल. राज्यसभेत भाजपनेच सर्वप्रथम धनगर समाजातील डॉ. विकास महात्मे यांना प्रतिनिधीत्त्व देण्याचा निर्णय घेतला आहे.चौंडी येथील विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. हे गाव विकास करण्यासाठी दत्तक घेतले आहे. या मेळाव्याला विविध राजकीय पक्षांचे ११ आमदार उपस्थित होते. चौंडी ही धनगर समाजाची पंढरी आहे. त्यामुळे जयंती उत्सव चौंडीतच दरवर्षी साजरा होईल. धनगर समाजाचे नेतृत्त्व यापुढे राम शिंदे यांनीच करावे, असा असा आग्रह उपस्थित आमदारांनी त्यांच्या भाषणातून केला. तसेच जानकर यांनी मुंबई येथे स्वतंत्र मेळावा घेतला, त्यावर आमदारांनी जाहीरपणे नापसंती व्यक्त केली. ‘अहिल्यादेवी यांची सेवा केली तर संधी आपोआप मिळते. जे मला मिळाले, ते तुम्हालाही मिळेल’,असे राम शिंदे यांनी सांगत नाव न घेता महादेव जानकर यांना टोला लगावला. राम शिंदे यांनी या मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.