शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

पंचाहत्तरीतही ‘साधू’ गाजवतोय तमाशाचा फड!

By admin | Updated: June 2, 2014 05:50 IST

माशाची कला जिवंत ठेवण्याची साधू व आत्मा (आत्मा आता हयात नाहीत) यांची जिद्द निश्चितच कौतुकास्पद. रंगमंचावर टाळ्यांची

प्रताप बडेकर, कासेगाव (सांगली) - वय वाढत चालले की, अंगातील शक्ती क्षीण होऊन काम करण्याचा उत्साह कमी होतो, असे म्हणतात़ मात्र, वयाची पंचाहत्तरी गाठूनही वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील नटसम्राट साधू कासेगावकर आजही तितक्यात जोमाने तमाशात फड गाजवतोय़ आतापर्यंत ‘साधू आणि आत्मा कासेगावकर’ या चुलत भावांच्या जोडगोळीने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आहे. तब्बल १० हजारांवर तमाशाचे प्रयोग करून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. तमाशाची कला जिवंत ठेवण्याची साधू व आत्मा (आत्मा आता हयात नाहीत) यांची जिद्द निश्चितच कौतुकास्पद. रंगमंचावर टाळ्यांची, तर शासनदरबारी पुरस्कार-मानधनाची दाद मिळणे एवढेच कलाकारास पुरेसे असते, ही त्यांची भावना. दोघांचाही जन्म खेडेगावातील. लहानपणापासूनच तमाशा कलाप्रकाराबाबत विलक्षण आवड आणि आकर्षण. शिक्षण फक्त तिसरीपर्यंत! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रेरणा घेऊन तमाशा कला जपण्याचे ठरवले. काही तरी वेगळे करून दाखवायचे म्हणून दोर वळणे, झाडू बनवणे हा पिढीजात धंदा बाजूला सारला. दोघांनीही रियाज सुरू केला. त्यातूनच मग ‘साधू-आत्मा कासेगावकर’ हा तमाशाचा फड उभा राहिला. स्थानिक कलाकारांची जुळवाजुळव करून ७५ कलाकारांचा ताफा तयार झाला. सुरुवातीला गाववार यात्रा, उत्सवात कार्यक्रम होऊ लागले आणि १९७६ मध्ये तंबूमधील तमाशाचा फड सुरू केला. हा तंबूचा फड घेऊन सलग १० वर्षे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनील पालथा घातला़ कालांतराने आर्थिक अडचण भासू लागली. त्या वेळी काळू-बाळूची जोडी लोकप्रिय होती. काळू-बाळू यांनी साधू-आत्मा यांना आपल्या तमाशात काम करण्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर, त्यांनी मागे वळून पाहिले नाही. काळू-बाळू, छबू नगरकर, रावसाहेब आकलेकर, शंकर कुलट, चंद्रकांत महाडिक, रोशनबाई सातारकर यांचे लोकनाट्य तमाशे गाजवले. हळूहळू आर्थिक घडी बसू लागली. त्यानंतर, नव्या उमेदीने तमाशाचा फड पूर्ववत उभा केला. भंडारा, नागपूर, अमरावती, पुणे, मुंबई, विजापूर, बेळगाव, नांदेड येथे कार्यक्रम केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणार्‍या महोत्सवात आजअखेर १२ वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी ‘साधू-आत्मा’ या जोडीला लाभली आहे. ‘यम’, ‘क्रांतिवीर उमाजी नाईक’, ‘संभाजी घोरपडे’, ‘१८५७ चा दरोडा’, ‘महाराणा प्रताप’ या वगनाट्यांतील साधू-आत्माच्या भूमिकांना रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. याची दखल घेऊन राज्य शासनाने २०१०-११ मध्ये ‘विठाबाई नारायणगावकर स्मृती लोककला जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरव केला. आज आत्मा कासेगावर हयात नाहीत, परंतु साधू कासेगावकर वयाच्या पंचाहत्तरीतही तरुणांना लाजवेल, अशी मेहनत घेऊन तमाशाची कला जोपासत आहेत. तीन मुलांपैकी मुरार आणि बाजीराव हे तमाशा फडामध्ये मदत करतात, तर तिसरा मुलगा पोपट प्राध्यापक आहे.