शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात होणार नवे ग्रामीण पोलीस ठाणे, २४ गावांचे कार्यक्षेत्र

By admin | Updated: April 24, 2016 21:26 IST

पोलीस प्रशासनाकडून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे विभाजन करुन नविन पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे सुरु करण्यात येत आहे. पुर्वी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्या अंतर्गत १०२ गावांचा कार्यभार होता

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. २४ - पंढरपूर तालुक्यातील लोकसंख्येत वारंवार वाढ होत आहे. त्याचबरोबर विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या चार यात्रेत येणाऱ्या भाविकांची संख्याही असल्याने पोलीस यंत्रणेवर जादा ताण पडत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाकडून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे विभाजन करुन नविन पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे सुरु करण्यात येत आहे.  पुर्वी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्या अंतर्गत १०२ गावांचा कार्यभार होता. मात्र यातील २६ गावांचे विभाजन करुन करकंब पोलीस ठाणे सुरु करण्यात आले. आता पुन्हा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे विभाजन करुन २४ गावांसाठी नविन स्वतंत्र ग्रामीण पोलीस ठाणे सुरु करण्यात येणार आहे. यामुळे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र ५२ गावांचे राहिले आहे. यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तत्काळ पोलीसांकडून मदत मिळण्यास होणार आहे.

पंढरपूर येथे नव्याने सुरु होत असलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याला योग्यती जागा मिळत नव्हती. ग्रामीण पोलीस ठाणे इसबावी येथे सुरु करण्याचे पोलीस प्रशासनाकडून ठरविण्यात आले. मात्र त्या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाल्या. यामुळे आता हे नविन पोलीस ठाणे उजनी सांस्कृतीक हॉलच्या परिसरातील आर.टी.ओ. कॅम्प भरणाऱ्या ठिकाणी हे नविन पोलीस ठाणे सुरु होणार आहे. या पोलीस ठाण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ६३ जणांचा स्टाफ मंजूर आहे.

या जागेत एक पोलीस निरक्षकाची खोली, ग्रामस्थांच्या तक्रारी घेण्यासाठी ठाणे अंमलदारची खोली, तसेच वायरलेस विभागाची एक खोली, पोलीस ठाण्याचे दस्ताऐवज ठेवण्यासाठी एक खोली असणार आहे. असे नविन ग्रामीण पोलीस ठाणे २४ गावांसाठी निर्माण करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिक्षक यांनी सांगितले.

या गावांसाठी पोलीस ठाणेकौठाळी, शिरढोण, वाखरी, शेळवे, खेडभाळवणी, भंडीशेगांवू, तिसंगी, पिराची कुरोली, वाडी कुरोली, गादेगांव, उपरी, सोनके, शेंडगेवाडी, केसरकरवाडी, जैनवाडी, भाळवणी, धोंडेवाडी, सुपली, पळशी, गार्डी, लोणारवाडी, कोर्टी, बोहाळी, उंबरगांव

असा असणार स्टाफपोलीस निरक्षक - १सपोनि. - १पो.उपनि. - ३सपोउनि. - ९पो.हवा. - १५पो.ना. - १५पो.शि. - १९

पालखी मार्गाचे कार्यक्षेत्र; जादा जबाबदारी

नविन सुरु होणाऱ्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पालखी मार्गावरची जादा गावे आहेत. पुर्वी सर्व कर्मचाऱ्यांना पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्यून काम करण्याच्या ठिकाणी जावे लागत होते. मात्र हे नविन पोलीस ठाणे यात्रा कालावधीत कमी गर्दी असते, अशा ठिकाणी आहे. यामुळे पालखी मार्गावरील यात्रेत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणात याच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर असणार आहे.