शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर तीर्थक्षेत्र सुंदर तर चंद्रभागा नदी शुद्ध करणार - सुधीर मुनगंटीवार

By admin | Updated: May 9, 2016 19:51 IST

चंद्रभागा नदी शुद्ध करणार असल्याचे प्रतिपादन वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 9- पंढरपूर तीर्थक्षेत्र स्वच्छ आणि सुंदर करताना लाखो वारकऱ्यांच्या मनात सामाजिक समतेचा अाध्यात्मिक वारसा प्रवाहित करणारी चंद्रभागा नदी शुद्ध करणार असल्याचे प्रतिपादन वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.आज सह्याद्री अतिथीगृहात नमामी चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आणि चंद्रभागा नदीचे शुद्धीकरण यासंबंधीची आढावा बैठक वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्यासह जीवनप्राधिकरणाचे तसेच पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पंढरपूरची चंद्रभाग नदी ही महाराष्ट्राच्या निखळ निरागस श्रद्धेचा मानबिंदू आहे. वारकारी आणि चंदभागा यांचे नाते अतूट असल्याने चंद्रभागेच्या पावित्र्याचे आणि निर्मळतेचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. हे लक्षात घेऊनच राज्य अर्थसंकल्पात ह्लनमामि चंद्रभागा अभियानह्व घोषित करण्यात आल्याचे सांगून वित्तमंत्री वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शासन आणि लोकसहभागातून हे अभियान राबवितांना पंढरपूर क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यालाही शासनाने प्राधान्य दिले आहे. आजमितीस तिथे १५ दशलक्ष लिटरचा सांडपाणी पक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहे. सध्या तो १२ दशलक्ष लिटर क्षमतेने सुरु आहे. आषाढी- कार्तिकी एकादशीच्या काळात वारी दरम्यान १८ दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते म्हणजेच याकाळात साधारणत: ६ दशलक्ष लिटर पक्रिया न केलेले पाणी चंद्रभागेत सोडले जाते. या प्रकल्पाची क्षमतावृद्धी करण्याचे काम नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत प्राधान्याने हाती घेतले जाणार आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात नमामि चंद्रभागा अभियानासाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परंतू पंढरपूर क्षेत्राचे महत्व व तिथे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या कार्यक्रमासाठी आवश्यक तितका निधी उपलब्ध करून दिला जाईल. येत्या १ जुन २०१६ रोजी पंढरपूर मध्ये ह्लनमामि चंद्रभागाह्व परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे ही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.पंढरपूरमध्ये तुळशी उद्यानासह वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमयेत्या आठवड्यात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर पंढरपूरला जाऊन यासंबंधीची सविस्तर पाहणी करतील व बैठक घेतील असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, पंढरपूर क्षेत्रातील वनराई वाढवण्याचे काम ही वन विभागामार्फत हाती घेतले जाणार आहे. यामध्ये वृक्षलागवडीबरोबर तुळशी उद्यानासारखे उद्यान पंढरपूरमध्ये उभारण्यात येतील. मी स्वत: साबरमतीनदीच्या शुद्धीकरणाचे जे काम झाले आहे त्याची पाहणी करणार आहे. तेथे नदीकाठी झालेल्या विकास कामांची पाहणी करणार असल्याचेही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.गोदावरीच्या धर्तीवर चंद्रभागा नदीकाठी कामआपण येत्या १३ मे रोजी पंढरपूरला जाणार असून चंद्रभागा नदीची पाहणी करणार आहोत. त्यानंतर सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, पैठण शहर हे दुसरी काशी म्हणून महाराष्ट्रास परिचित आहे. याठिकाणी संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी तसेच गोदावरी नदीत दशक्रिया विधी व अस्थी विसर्जन करण्यासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. यामुळे गोदावरी नदीचे पाणी प्रदुषित होऊ नये, तीर्थक्षेत्र परिसर स्वच्छ आणि सुंदर राहावा यादृष्टीने विविध विकास कामे हाती घेतली होती.. यामध्ये घाट बांधकाम, रक्षाकुंड, दशक्रिया विधी मंडप, काँक्रिटचे रस्ते, सुलभ शौचालय व इतर व्यवस्था कचराकुंडी, हायमास्ट विद्युतीकरण या कामांचा समावेश होता. याधर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कामं करण्यात येणार असून ही सर्व कामे जीवनप्राधिकरणामार्फत केली जातील.