शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरात पूर परिस्थिती ; अनेक मंदिरे पाण्याखाली, व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 16:42 IST

१ लाख १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत येत असल्याने पंढरपुरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे़ भीमा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे़ 

ठळक मुद्दे१ लाख १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीतदोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ भीमा नदीकाठी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीसह इतर सखल भागात पाणी शिरण्याची शक्यतानदीपात्राजवळ प्रशासनाने कोणतीच यंत्रणा लावली नाही़

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर : उजनीतून ७० हजार क्युसेक आणि वीर धरणातून ४५ हजार क्युसेक असे एकूण १ लाख १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत येत असल्याने पंढरपुरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे़ भीमा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे़ उजनी धरणातून १४ सप्टेंबर रोजी ७० हजार क्युसेक तर वीर धरणातून ४५ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे़ त्यामुळे भीमा नदीत सध्या १ लाख १५ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे़  तसेच उजनी धरण व पंढरपूर तालुक्यात सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊ लागली आहे.सध्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह सर्व मंदिरे पाण्याखाली गेली असून घाटाना पाणी लागले आहे. भीमा नदीकाठी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीसह इतर सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रशासनाने या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची व्यवस्था केली आहे. पंढरपूर शहरासह नदी काठच्या गावातील लोकांना देखील सुरक्षित स्थळी हलविण्याच्या तयारीला प्रशासन लागले आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.धोकादायक स्थितीत भाविकांचे स्नानभीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे़ अशी स्थिती असतानाही नदीपात्राजवळ प्रशासनाने कोणतीच यंत्रणा लावली नाही़ पूर परिस्थिती असतानाही भाविक स्नानासाठी नदीत उतरू लागल्याने धोका वाढला आहे. काही भाविक घाटापासून दूर नदी पात्रात जाऊन स्नान करीत आहेत़ मात्र वेगाने पाणी वाहत असल्याने भाविकांना स्नानापासून रोखणे गरजेचे आहे. शिवाय भीमा नदीवर प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा तातडीने कार्यान्वित करणे गरजेचे आहे़