विक्रमगड: बहुचर्चित नगरपंचायतीच्या मागणीसाठी विक्रमगडवासीयांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता व अखेर ही मागणी पूर्ण होऊन ७ मे रोजी विक्रमगड ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. या नगरपंचायतीसमोर अंतर्भूत खेडयाचा विकास, वीज, पाणी पुरवठा सुधारणे व अतिक्रमण हटविण्याचे मोठे आव्हान आहे. नगरपंचायत झाल्याने ग्रामस्थांच्या विकासाच्या अपेक्षा उंचावल्या आहे. परंतु विकास होताना दिसत नाही. शहरात मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या काळात पथदिवे बसविण्यात आले परंतु गेल्या अनेक महिन्यापासून जरीमरी नगरसाख्या विभागात ते बसविले नाही. मुख्य रस्त्यावरील गटारी साफ न केल्याने कालच्या पावसाने रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत होता. कचऱ्यासाठी स्वतंत्र यंत्रणा ठेवणे गरजेचे आहे पाणी पुरवठयासाठीही शुध्द पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. या सुविधा खऱ्या अर्थाने मिळतील तेव्हाच ती नगरपंचायत सार्थ ठरेल. नगरपंचायतीशी संबधीत सर्व अधिकार आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून तहसिलदार यांची नियुक्तीही झाली मात्र कारभारास म्हणावा तसा वेग न आल्याने शहरातील नागरी समस्या कायम आहेत.मुख्य बाजाराच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे त्यामुळे प्रामुख्याने महिलांची खूप मोठी सोय होईल. ही मागणीही अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. (वार्ताहर)>प्रशासकीय ढाँचा बदलून काय होणार ?निधीत वाढ नाही, सक्षम कर्मचारी नाहीत, साधन सामग्री नाही अशा स्थितीत केवळ प्रशासकीय ढाँचा बदलून काय फरक पडणार? असा स्थानिकांचा प्रश्न आहे.अनेक ठिकाणी तहसीलदारांकडेच नगरपंचायतींचा कार्यभार आहे. त्यामुळे प्रारंभापासूनच त्यांच्या कारभारात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.नगरपंचायत माध्यमातून मोठी नळयोजना कार्यान्वित होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांना मुबलक पाणी मिळेल आणि नविन पाइपालाइन टाकल्याने गढुळ पाणी स्वच्छ व पुरेशा दाबाने मिळेल. - प्रशांत भानुशाली, माजी ग्रामपंचायत सदस्य
पंचायतीने झाली पंचाईत
By admin | Updated: June 30, 2016 03:34 IST