शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

टँकर न मिळाल्याने पंचायत समिती आवारात परीक्षा!

By admin | Updated: April 5, 2016 00:58 IST

पिण्याच्या पाण्याचे टँकर न दिल्याने मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टमधील ५०० विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि. ४) इंदापूर पंचायत समितीच्या आवारात ठिय्या मांडून वार्षिक परीक्षा दिली.

इंदापूर : पिण्याच्या पाण्याचे टँकर न दिल्याने मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टमधील ५०० विद्यार्थ्यांनी सोमवारी (दि. ४) इंदापूर पंचायत समितीच्या आवारात ठिय्या मांडून वार्षिक परीक्षा दिली. आश्रमशाळेतील मुलांसाठी दररोज दोन पाण्याचे टँकर पाठवा; अन्यथा सोमवारपासून कोणत्याही दिवशी ५१८ विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय, पंचायत समितीमध्ये पाठवण्यात येईल. तेथेच ते प्रातर्विधी करतील. त्यांची वार्षिक परीक्षा तेथेच घेतली जाईल, असा इशारा ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय चालवण्यात येते. मागसवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थिनींची वसतिगृहे आहेत. ३६८ मुले-मुली शिक्षण घेतात. याखेरीज १५० अनिवासी विद्यार्थीही आहेत. या सर्वांना दररोज ३० ते ३५ हजार लिटर पाणी लागते. ते पाणी पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे. खडकवासला विभागाचे शाखा अभियंता के. के. देवकाते यांनी तीन वेळा आवश्यकता असताना देखील ट्रस्टच्या पाणी साठवण तलावात पाणी सोडले नाही. पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. दररोज दोन टँकर पाणी देण्याची सोय करावी; अन्यथा सोमवारनंतर वरील आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात मखरे यांनी म्हटले होते. निवेदन मिळाल्यानंतर इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिकेत पाटील यांनी आश्रमशाळेवर जाऊन मखरे यांच्याशी चर्चा केली होती. टँकरच्या मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र टँकर मिळाले नाहीत. त्यामुळे सोमवारी सकाळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना घेऊन मखरे पंचायत समितीमध्ये आले. आवारातच वार्षिक परीक्षा घेतली. दिवसभर विद्यार्थी येथेच थांबणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी नैसर्गिक विधी करू नयेत, म्हणून पंचायत समितीतील स्वच्छतागृहांना कुलुपे लावण्यात आली होती. (वार्ताहर)