बोईसर/केळवे-माहीम : येथे वर्षानुवर्षे नांदत असलेली आदिवासी संस्कृती, कला, बोलीभाषा कायम ठेवून नव्या पालघर जिल्ह्याचा विकास करू. हा नवा जिल्हा विकासाचे एक रोलमॉडेलच ठरेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालघर जिल्ह्याच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पालघर जिल्ह्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. नवीन पालघर जिल्ह्याच्या विकासाबाबत मुख्यमंत्री म्हणाले, येथे पहिल्या दिवसापासून जिल्हा कार्यालय सुरू करण्यात आले असून भविष्यात सर्व सुखसोयीने युक्त असलेला असा पालघर जिल्हा नावारूपाला येईल. पालघर जिल्ह्याचे टाऊन प्लानिंग विशेषत: जो प्रशासकीय भाग आहे, तो भाग देशातील एक सर्वोत्कृष्ट जिल्हा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. पालघर जिल्हा मुख्यालयाशी त्वरित व जलदपणे संपर्क होण्यासाठी जव्हार-पालघर, बोईसर-पालघर, जव्हार-मनोर असे सहापदरी रस्ते तयार करण्यात येतील, असे सांगितले. पालघर जिल्ह्याच्या उद्घाटनाचे व महसूल दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-स्कॅनिंग, ई-म्युटेशन, ठाणे प्रतिबिंब (किआॅस्क) व परिवार कवच (कुटुंब दाखले पुस्तिका) या चार लोकाभिमुख योजनांना सुरुवात करण्यात आली. महसूलमंत्री थोरात यांनी जिल्ह्याचे मुख्यालय जव्हार व्हावे, असा आग्रह होता, असे सांगून पालघर मुख्यालय केले तरी जव्हार येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालय, तेथील कर्मचारीवर्ग कायम राहणार असल्याचे सांगितले़ आदिवासींचे प्रश्न तेवढेच तत्परतेने सोडवले जातील. समस्यांची यादी द्या, लवकरच पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे (पान २ वर)
पालघर ठरेल विकासाचे रोलमॉडेल
By admin | Updated: August 2, 2014 03:12 IST