शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

FTII च्या सदस्यपदाचा पल्लवी जोशी यांचा राजीनामा

By admin | Updated: July 7, 2015 02:45 IST

अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

पुणे : अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्याबरोबरच सदस्यांच्या नियुक्तीलाही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यातून जोशी यांनी तीन दिवसांपूर्वी राजीनामा दिला.केंद्राने एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान तर सदस्य म्हणून अनघा घैसास, शैलेश गुप्ता, नरेंद्र पाठक, राहुल सोलापूरकर, पल्लवी जोशी यांची नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. व्हिजन नसलेल्या व्यक्तींच्या केलेल्या या नियुक्त्या रद्द कराव्यात, या मागणीसाठी गेल्या २४ दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर पल्लवी जोशी यांनी, ‘विद्यार्थीच नाखूश असतील तर त्या पदाचा काय उपयोग?’ अशी भूमिका जाहीर करीत नियामक मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. एफटीआयआयमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच चर्चेसाठी विद्यार्थी प्रतिनिधींना निमंत्रित केले होते. मात्र नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहानच राहतील या निर्णयावर केंद्र सरकार ठाम राहिल्याने ही चर्चा फिसकटली. हे सर्व वातावरण पाहता विद्यार्थ्यांच्या हितासाठी पल्लवी जोशी यांनी नियामक मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा देणे पसंत केले आहे. ------------शासनाची जबाबदारी जशी चांगले अभियंते घडविण्याची आहे, तशीच ती कलाकार आणि तंत्रज्ञ घडविण्याचीदेखील आहे. एफटीआयआयमध्ये कोणती तरी उमेद घेऊन येणाऱ्या मुलांचे पंख छाटण्याचे काम आपण करू नये. आम्ही केवळ फिल्म इंडस्ट्रीजचे ‘ड्रीम मर्चंट’ आहोत. पण आमच्या नियुक्तीमुळे विद्यार्थीच नाखूश असतील तर त्या पदाचा काय उपयोग? - पल्लवी जोशी