शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पालखी मुक्कामी मेघडंबरी, बहुउद्देशीय इमारत

By admin | Updated: September 22, 2016 02:05 IST

संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या मुख्य मुक्कामासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले

बारामती / इंदापूर : जगद्गुरू संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या मुख्य मुक्कामासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून बुधवारी बारामती व इंदापूर तालुक्यात विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली.बारामतीचे नगराध्यक्ष योगेश जगताप, प्रांताधिकारी हेमंत निकम, संतोष जाधव, तहसीलदार हनुमंत पाटील व मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी शहरातील विविध भागांची पाहणी करून उपलब्ध करावयाच्या सुविधांबाबत चर्चा केली. शहरातील वसंतराव पवार नाट्यगृह, शारदा प्रांगण, जळोची येथील बाजार आवार, हरिकृपानगर येथील ओपन स्पेस आदी ठिकाणी विविध कामे केली जाणार आहेत. त्याची पाहणी केली.विविध भागांच्या पाहणीनंतर पालखी मुक्काम स्थळ विकास आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी प्रशासकीय बाबी पूर्ण करून तत्परतेने कामे मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या. नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी चोक्कलिंगम व राव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पालखी सोहळ्यासाठीच्या विकास आराखड्याअंतर्गत होणाऱ्या कामांसाठी बारामती नगर परिषदेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही योगेश जगताप व नीलेश देशमुख यांनी दिली.(प्रतिनिधी)पालखी मुक्काम स्थळाच्या विकास आराखड्यामुळे वारकऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. पालखी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये, याची काळजी यानिमित्ताने घेतली जाणार आहे.इंदापूर शहरास भेट देऊन पालखी रिंगण सोहळा व मुक्काम तळाची पाहणी केली. या वेळी बारामतीचे माजी प्रांत संतोष जाधव, विद्यमान प्रांत हिंमतराव निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे, कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे, तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहायक अभियंता एल. बी. जाधव व पालखी सोहळ्याचे विश्वस्त होते. या वेळी त्यांनी रिंगण सोहळा होत असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणाची व श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये होणाऱ्या मुक्कामाच्या स्थळाची पाहणी केली. आजच्या दौऱ्यात मूळ ठिकाण, नियोजित ठिकाण सोई-गैरसोई यावर प्रारंभिक विचार झाला. रयत शिक्षण संस्थेच्या शेजारी दहा एकर क्षेत्र आहे ते सोयीस्कर आहे. त्यावर विचार होईल. (वार्ताहर)>पालखी मार्ग व तळाचा विकास करणे हा मुख्य उद्देश आहे. गर्दी वाढणार असल्याने काही अनुचित प्रकारांना सामोरे जाण्याची वेळ वारकऱ्यांवर येऊ नये, यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी शासनाच्या मालकीची किमान दहा एकर जागा शासन, विश्वस्तांच्या नावे घेऊन विकास करण्याचे धोरण आहे. यात मेघडंबरी, बहुउद्देशीय इमारत, अशी कामे केली जाणार आहेत. वर्षातील एक दिवस ती पालखी सोहळ्यासाठी, तर उर्वरित वर्षभर ती वेगवेगळ्या उपक्रमासाठी वापरली जाईल. ग्रामपंचायत अथवा इतर संस्थांकडून तिची देखभाल ठेवली जाईल.- एल. बी. जाधव, अभियंता