शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दारूसाठी पालघर पालिकेची धावपळ

By admin | Updated: May 6, 2017 05:26 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्याने पालघर मधील बंद पडलेल्या दारू दुकाने पुन्हा सुरु करण्यावर पालघर नगरपरिषदेच्या शनिवारच्या सभेत शिक्का

हितेन नाईक/  लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्याने पालघर मधील बंद पडलेल्या दारू दुकाने पुन्हा सुरु करण्यावर पालघर नगरपरिषदेच्या शनिवारच्या सभेत शिक्का मोर्तब होणार आहे. विशेष सभेत ‘राजमार्ग हस्तांतर’ हा विषय पहिल्या क्र मांकावर असल्याने या संदर्भातील अग्रक्र मही ह्यातून दिसून येत आहे. मुळात पालिकेचा अर्थसंकल्प अवघा ३४ कोटींचा असतांना महामार्ग दुरुस्ती व डागडूजीसाठी लागणारा कोट्यवधीचा निधी आणणार कुठून असा ही प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.ठरावाचे नियोजन करुन दारू दुकानदारांच्या मदतीलाच पालघर नगरपरिषद धावुन आली असून ज्या राज्यमार्गाच्या नियमाने हे दारु दुकाने बंद पडली आहेत तो माहीम ते नंडोरे हा राज्य महामार्ग ताब्यात घेऊन ही बंद पडलेली दारू दुकाने पुन्हा सुरु करण्याचा ह्या मागे डाव असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे.पालघर नगर परिषदेने उद्या (६ मे विशेष सभा बोलावली असून ह्या सभेत निविदा ना मंजुरीसह डिम्पंग ग्राउंड, मालमत्ता कारांचे मूल्यांकन व रस्ता रु ंदीकरण यासह नगरपरिषद हद्दीतील रस्ते, राजमार्ग नागरपरिषदेकडे हस्तांतर करण्याबाबतचा विषय समाविष्ट आहे. ह्या पाच विषया पैकी राजमार्ग रस्ते हस्तांतरित करण्याचा म्हणजेच दारू दुकानांना अभय देण्याचा विषय पहिल्या क्र मांकावर ठेवण्यात आला आहे. हे रस्ते, राजमार्ग नगरपरिषदे कडे वर्ग झाल्यानंतर ह्या मार्गाचा राजमार्गाचा दर्जा आपोआप निघून जात बंद झालेली दारू दुकाने सुरु करण्याचा मार्ग निघणार आहे. ह्यासाठी मोठा आर्थिक फंड तयार ठेवण्यात आला आल्याचेही कळते.पालघर जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ४४१ परिमट रूम आणि बिअर शॉपिवर बंदीची कुऱ्हाड कोसळली होती. न्यायालयाच्या आदेशाने ही दुकाने बंद पाडल्याचे भासविण्यात येत असले तरी अनेक दुकाने आजही छुप्या पद्धतीने सुरु असल्याचे दिसून येत आहेत. आपली बंद पडलेली दुकाने पुन्हा सुरु व्हावीत ह्यासाठी काहींचा आटापिटा सुरु असून लागेल तेव्हढी आर्थिक रसद पुरविण्याची तयारी करून आपली दारू दुकाने सुरु करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेतली जात आहे असेच या प्रकरणावरून दिसत आहे. मुंबई-अहमदाबाद राज्यमहामार्गा वरून मनोर-मासवण-नंडोरे-चार रस्ता-माहीम ह्या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला असून न्यायालयाच्या निर्णयाने ह्या रस्त्याच्या पाचशे मीटर्स कक्षेत आलेल्या नेस्ट परिमट रूम अँड बार, साई रेसिडेन्सी, अभिषेक आदी २० ते २५ परिमट रु म आणि बिअर बार बंद पडले आहेत. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी नगर परिषद हद्दीतील सर्व रस्ते, राज्यमार्ग नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याचा विषय उद्याच्या विशेष सभेत ठेवण्यात आला आहे.पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप?पालघर मधील बाधित दारू दुकानदारांनी ह्या संदर्भात पालक मंत्री विष्णू सवरा ह्यांची भेट घेतल्याचे समजते. ह्या भेटी नंतर पालक मंत्र्यांनी मुख्यधिकाऱ्यांना बोलावून घेऊन रस्ते हस्तांतरणाची प्रक्रि या करण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले जाते. दरम्यान, शनिवारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बाधित दुकानदार नगर सेवकांची भेट घेणार आहेत.बंद पडलेली दारू दुकाने पुन्हा सुरु झाल्यास त्यांच्याकडून करापोटी वर्षाला ३ ते ४ लाख रु पये महसूल मिळणार आहे. परंतु ज्या दारू दुकानदाराच्या फायद्यासाठी राज्यमार्ग नगरपरिषदेकडे वर्ग केल्यास ह्या रस्त्याच्या देघभाल दुरु स्ती साठी मात्र नगरपरिषदेवर कोट्यवधी रु पयांचा भुर्दंड पडणार असे माजी नगरसेवक नितांत चव्हाण यांनी सांगितले.