शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

पालघर पालिकेचे अंदाजपत्रक शिलकी

By admin | Updated: March 2, 2017 03:11 IST

शिलकीचे अंदाजपत्रक विरोधी पक्षनेत्यांसह काही नगरसेवकांनी सुचविलेल्या सुधारणांसह मंजूर करण्यात आला.

पालघर : नगरवासियांना कोणत्याही नवीन सोयीसुविधा न देणारा, मात्र त्याचवेळी त्यांच्यावर कराचा कोणताही नवीन बोजा न टाकणारा ५ कोटी ९८ लाख २८ हजार २३० रुपये शिलकीचे अंदाजपत्रक विरोधी पक्षनेत्यांसह काही नगरसेवकांनी सुचविलेल्या सुधारणांसह मंजूर करण्यात आला.नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांच्या अध्यक्षतेखालील सभेत सुमारे साडेतीन तासाच्या चर्चेनंतर सभागृहाने यावर आपल्या अनुमतीची मोहर उठवली. आगामी वर्षातील या अर्थसंकल्पातील सफाई ठेका, औषध फवारणी आदी बाबी वरील प्रस्तावित वाढीव खर्चावर सदस्यांनी आक्षेप नोंदविला. सफाई ठेक्यासाठी आगामी वर्षात ३ कोटी इतकी प्रचंड तरतूद करण्यात आली आहे.मागील ३ वर्षातील व चालू वर्षातील खर्चाच्या तुलनेत ही रक्कम अवास्तव असल्याचे व नागरिकां ऐवजी ठेकेदारांचेच हित जपणारे असल्याचा मोठा आक्षेप यावेळी सदस्यांनी घेतला. जंतू नाशके व औषध फवारणीच्या तरतूदी संदर्भातील नगरसेवकांनी असाच आक्षेप नोंदविला. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या सेवांचा दर्जा खर्चा बरोबरीने सुधारणे आवश्यक असतांना तो दिवसेंदिवस ढासळत आहे. तर त्यावरील खर्च वाढतो आहे अशी चिंताही सदस्यांनी यावेळी व्यक्त केली.आगामी वर्षात ३० कोटी ५० लाख १३ हजार इतकी महसूली जमा व ५ कोटी ९८ लाख २८ हजार २३० रुपये इतक्या अपेक्षित शिलकेसह ४६ कोटी ४६ लाख ९७ हजार २३० इतकी रक्कम नगरपरिषदेला आपली विकास कामे व प्रशासकीय खर्चासाठी उपलब्ध होणार असून त्यापैकी ४० कोटी ४८ लाख ६८ हजार इतका खर्च आगामी वर्षात अपेक्षित आहे. या वर्षातील आठ महिन्यातील प्रत्यक्षातील सुमारे १६ कोटी इतक्या खर्चाच्या अडीच पट इतका हा खर्च अपेक्षित आहे. सन २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षात अनुक्र मे ३७ कोटी व ४२ कोटी इतका महसूल प्रत्यक्षात जमा झालेला असून २०१६-१७ मध्ये हा महसूल घसरत जाऊन २२.५० कोटी तर आगामी वर्षात ३०.५० कोटी म्हणजेच २०१४-१५ व २०१५-१६ च्या तुलनेत घसरलेला दिसतो. २०१६-१७ च्या तुलनेत यामध्ये ८ कोटींची वाढ दिसत असली तरी २०१५-१६ च्या तुलनेत महसूली व भांडवली जमेत सुमारे ११ कोटी इतकी घसरण आहे. तर सन २०१४-१५ च्या तुलनेत ७ कोटी आहे. सन २०१४-१५ (३०.७५ कोटी), २०१५-१६ (३८.५७ कोटी), या महसूली व भांडवली खर्चाच्या तुलनेत अनुक्रमे आगामी वर्षातील खर्च १० कोटी व दीड कोटी इतका वाढलेला दिसतो.आगामी वर्षात वेतनापोटी १.८० कोटी इतका खर्च अपेक्षित असून स्वच्छता व सफाई ठेक्यासाठी नगरसेवकांनी सुधारणा सुचवूनही २.२५ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. याच बरोबरीने दिवाबत्ती देखभाल, दुरु स्तीसाठी ९० लाख, जंतू नाशके फवारणीसाठी ८३ लाख, गटारे व नाले सफाईसाठी ५० लाख इतका खर्च दर्शविण्यात आला आहे. >अशी आहेत नवी विकासकामेविकासकामांतर्गत रस्त्यांची ५ कोटी, बगीचे नूतनीकरण १ कोटी, सांडपाणी प्रक्रिया केंद्र २० लाख, शौचालये उभारणी १५ लाख, रस्त्यावरील दिवे २.५० कोटी, अशा काही विकास कामाच्या तरतुदी हे ह्या अर्थसंकल्पाचे छोटेसे वैशिष्ट्य सांगता येईल. ह्या उलट नागरपरिषदेला मालमत्ता करातून ७ कोटी, पाणीपट्टी ३ कोटी, बाजारकार २५ लाख, इतके उत्पन्न तर अनुदानाच्या स्वरूपात १४ व वित्त आयोग ३ कोटी, दलीतवस्ती सुधारणा ३० लाख, प्राथमिक शाळा अनुदानाचे ३० लाख असा महसूल अपेक्षित आहे.