शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

पाकिस्तानची साखर मुंबईत, ३० हजार क्विंटलची आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 05:01 IST

ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याच्या केंद्र

राजाराम लोंढेकोल्हापूर : ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा फायदा उठवित मुंबईतील एका बड्या उद्योग समुहाने ३० हजार क्विंटल साखरेची आयात केली आहे.विशेष म्हणजे पाकिस्तानच्या साखरेचे दर स्थानिक साखरेपेक्षा एक रुपयांनी कमी आहेत. कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात चॉकलेटमधील साखरेएवढीच ३० हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली आहे. पनवेल आणि वाशी येथील गोदामामध्ये ती ठेवण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशात ३१६ लाख टन यंदा साखरेचे उत्पादन, तर गेल्या वर्षीचे ४० लाख टन साखर शिल्लक आहे. एफआरपीप्रमाणे पैसे देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नाहीत. शेतकरी, साखर कारखानदारांच्या रेट्यानंतर केंद्राने निर्यात अनुदानाची घोषणा करीत आयात शुल्क वाढविले. त्यामुळे बाजारातील साखरेचे दर स्थिर होतील, अशी अपेक्षा असतानाच पाकिस्तानची साखर आयात झाली.सहा महिने ‘रेक’ मोकळीचकोल्हापुरातून रोज २६०० टन साखर रेक (रेल्वे) मधून पंजाब, पश्चिम बंगाल, गुवाहाटी आदी राज्यांत जात होती; पण गेल्या सहा महिन्यांपासून एकही रेक जाऊ शकलेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.‘पाकची साखर शेतकºयांना उद्ध्वस्त करणारी’ठाणे : भारतीयांना उद्ध्वस्त करण्यासाठी पाकचा माल आयात करण्याचे नवे धोरण भाजपा सरकारने आखले आहे. ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. ऊस उत्पादक शेतकरी हमीभावासाठी आक्रोश करत असताना, पाकिस्तानातील साखर येथे आणून आमच्या शेतकºयांना उद्ध्वस्त केले जात आहे. पाकची ही साखर आमच्या देशात विकू देणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.राज्यातील ऊस उत्पादक आणि साखर कारखाने संकटात असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानची साखर दाखल झाली आहे. ही साखर येथील बाजारभावापेक्षा एक रुपयाने कमी किमतीची आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा आमदार आव्हाड यांनी दिलेल्या पत्रकात समाचार घेतला.पाकिस्तानची साखर आयात का केली ?-राजू शेट्टीपुणे : साखरेचे चांगले उत्पादन झाले आहे. तरी पाकिस्तानमधून मुंबईमध्ये साखर का आणली गेली, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. दिवसेंदिवस साखरेचे दर कमी होत असताना निर्यातीपेक्षा पाकिस्तानमधून आयात करण्यावर भर का दिला जात आहे. त्यावरून शेतकºयांची सरकारला किती काळजी आहे, ते समजतेय, असा टोलाही त्यांनी लगावला. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४४ व्या ज्ञानसत्रात सदाशिवराव पिंगळे स्मृती व्याख्यानात बळीराजाला-दयेची नाही तर न्यायाची गरज आहे, या विषयाची शेट्टी यांनी मांडणी केली.शेट्टी म्हणाले, आपल्या देशात टोमॅटो ५ रुपये किलोने विकला जात होता. तेव्हा पाकिस्तानात २०० रुपये किलो दर होता. तरी त्यांनी शत्रू राष्टÑाकडून टोमॅटो घ्यायचा नाही, अशी भूमिका घेतली होती. आपण मात्र त्यांच्याकडून साखर आयात करत आहोत. शेतकºयांच्या मालाला भाव मिळू नये, असे धोरण राज्यकर्त्यांनी केले आहे. आपली मते पक्की करण्यासाठी शेतकºयांचा बळी देऊन सर्वसामान्यांना खुश ठेवण्यात राज्यकर्ते यशस्वी झाले असल्याचेही शेट्टी म्हणाले.आयात शुल्कात पळवाट काढून अशा प्रकारे साखर देशात आल्याने साखर उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन आयातीबाबत कडक पावले उचलली नाही तर हा उद्योग उद्ध्वस्त होईलच, पण शेतकरीही देशोधडीला लागेल.- पी. जी. मेढे, तज्ज्ञ,साखर उद्योग, कोल्हापूर