शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

भाताला लष्करी अळीचा विळखा

By admin | Updated: October 17, 2016 02:51 IST

मान्सून रिटर्नच्या फटक्याने गेल्या महिन्यात संकटात असलेला शेतकरी आता लष्करी आळीच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडला

अनिरुद्ध पाटील,

डहाणु/बोर्डी- मान्सून रिटर्नच्या फटक्याने गेल्या महिन्यात संकटात असलेला शेतकरी आता लष्करी आळीच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडला आहे. डहाणू तालुक्यातील मोठ्या भात शेतीच्या पट्ट्यामध्ये लोंब्या नष्ट होत असल्याने आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आदिवासी शेतकरी पुरता धायकुतीला आला आहे.दोन वेळा झालेली अतिवृष्टी वगळता यंदा एकुणच पाऊस चांगला झाल्याने भात पीक जोमात आले आहे. परंतु डहाणू तालुक्यात कापणीला आलेल्या भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यामुळे हाती आलेल्या पिकाचे नुकसान होण्याची भीती बळीराजाला सतावते आहे.तालुक्यातील भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या करीता शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी मंडळ कृषी अधिकारी अनिल नरगुलवार आणि कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उत्तम सहाणे, कृषी सहाय्यक विशाल नाईक, सुरेश बारी यांनी क्षेत्र भेटीद्वारे परिसरातील भात शेतींची पाहणी केली. २४ ते ४८ तासात पिकाचे मोठे नुकसान कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या पहाणीमध्ये जांबुगाव, अस्वाली, खुनावडे या आदिवासी गावात लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे. उभ्या भात पिकावर लष्करी अळी हल्ला करीत असल्याने २४ ते ४८ तासात पिकाचे मोठे नुकसान करीत आहेत. या किडीची अळी दिवसा मातीमध्ये लपून राहते. तर रात्रीच्या वेळी बाहेर येऊन भात पिकाच्या तयार ओंब्या तोडून खाते. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त शेतात असंख्य ओंब्या व दाणे जमिनीवर पडून पिकाची नासाडी होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी हवालिदल झाला आहे. >‘फोरेट १० जी’चा वापर कराकापणीला आलेल्या भात पिकाच्या संरक्षणासाठी पिकाची त्वरित कापणी करावी. ज्या शेतात अळीची लागण झाली आहे तेथून लष्करी अळी दुसऱ्या शेतात जाण्याची दाट शक्यता आहे. भात कापणीला ८ ते १० दिवसांचा अवधी असल्यास शेताच्या सभोवताली बांधाच्या कडेने फोरेट १० जी दाणेदार हे किटकनाशक टाकावे. शिवाय दुसऱ्या शेतातून अळया रोखण्यासाठी तयार भात पीक कापुन सुरिक्षत जागेत ठेवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी उपाययोजना अमलात आणून भात पिकाचे रक्षण करावे असे आवाहन कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी केले आहे.