शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटके ठेवण्यात पाकचा थेट सहभाग

By admin | Updated: September 13, 2015 03:01 IST

मुंबईत २००६ साली बॉम्बस्फोट घडविण्यासाठी लष्कर-ए-तोएबाचा कमांडर आजम चिमा याने ‘सिमी’च्या हस्तकांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिले खरे; पण ही मंडळी स्फोटके पेरून कट

- डिप्पी वांकाणी,  मुंबई मुंबईत २००६ साली बॉम्बस्फोट घडविण्यासाठी लष्कर-ए-तोएबाचा कमांडर आजम चिमा याने ‘सिमी’च्या हस्तकांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिले खरे; पण ही मंडळी स्फोटके पेरून कट तडीस नेतील याची त्याला खात्री नव्हती. त्यामुळे त्याने सात ठिकाणी स्फोटके पेरणाऱ्या भारतीयांवर नजर ठेवण्यासाठी पाकिस्तानी ‘लष्कर’ आॅपरेटिव्ह सोबत ठेवले होते.बॉम्ब पेरणाऱ्यांचे मनोधैर्य शेवटच्या क्षणी ढासळू नये यासाठी त्यांना तसे प्रशिक्षण देण्यात आले होते. पाकिस्तानात प्रशिक्षण घेणारे ‘सिमी’चे हस्तक बॉम्ब पेरतीलच याबाबत चिमाला पूर्ण विश्वास नव्हता. म्हणूनच त्याने ‘सहायकांच्या जोड्या’ सोबत ठेवल्या होत्या. हे बॉम्ब भारतीय नागरिकांनीच पेरावेत, अशी चिमाची इच्छा होती. शिवाय स्फोट झाल्यानंतर त्यात पाकिस्तानचे नाव येऊ नये अशीही चिमाची इच्छा होती; तरीपण भारतीयांनी बॉम्ब न पेरल्यास पाकिस्तानी आॅपरेटिव्हज्नी बॉम्ब पेरावेत, असा आदेश चिमाने दिला होता, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, मुंबई स्टॉक एक्स्चेंज येथील कडक सुरक्षा व्यवस्था पाहून तेथे स्फोटके पेरणे अशक्य असल्याचे पाकिस्तानी आॅपरेटिव्हज्नी चिमाला कळविले होते. त्यामुळे त्याने उपनगरी रेल्वेगाड्यांत स्फोट घडविण्याचा कट रचला. या स्फोटासाठी दुबईतून हवालामार्गे पैसा पाठविणाऱ्या राहिल शेख याला स्थानबद्ध केल्याची माहिती २०१०मध्ये बर्मिंगहॅमहून (लंडन) पाठविली होती. तेव्हा आपल्याला मोठेच यश मिळाल्याची समजूत झाली. इंटरपोलने राहिल शेखबाबत दिलेली माहिती सत्य ठरली असती तर एटीएसला एक मोठेच यश मिळाले असते, असेही हा अधिकारी म्हणाला. या प्रकरणी संभ्रम निर्माण व्हावा यासाठी दहशतवाद्यांनी आपण त्यात सहभागी झाल्याचा दावा केला. २००८ साली अटक करण्यात आलेल्या सादिक शेख या इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्याने अशा प्रकारच्या कार्यपद्धतीची माहिती दिली होती. ७/११चा हल्ला इंडियन मुजाहिदीनने केल्याचा दावाही सादिकने केला होता. याच पद्धतीने इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक यासीन भटकळ याने जर्मन बेकरीत बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. या प्रकरणी पोलिसांनी हिमायत बेगला अटक केली आहे.विरार फास्ट लोकलमध्ये बॉम्ब पेरताना (मीरा रोड स्फोट) सलीम, हफिजुल्लाह, अस्लम, अबुबकर, अम्मूजान, अबू उमेद, साबीर एहतेशाम सिद्दिकी हे पाकिस्तानी आॅपरेटिव्ह त्या वेळी उपस्थित होते. बोरीवली येथे झालेल्या स्फोटातील स्फोटके पेरताना अम्मूजान आणि आसिफ खान उपस्थित होते. बोरीवली स्लो लोकलमध्ये (जोगेश्वरी स्फोट) बॉम्ब ठेवताना साबीर, फैसल शेख उपस्थित होते. बोरीवली लोकल या अन्य एका लोकलमध्ये बॉम्ब (खार स्फोट) ठेवताना अबू उमेद, कमल अन्सारी उपस्थित होते. विरार फास्ट लोकलमध्ये (माटुंगा रोड स्फोट) बॉम्ब पेरताना सलीम उपस्थित होता. सिद्धिविनायक, महालक्ष्मी होते टार्गेटखरेतर, मुंबईत स्फोट घडविताना लोकलच्या प्रथमश्रेणी डब्यात बॉम्ब पेरण्याचा पाकिस्तान्यांचा मूळ विचार नव्हता. सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर आणि स्टॉक एक्स्चेंज हे त्यांचे ‘टार्गेट’ होते; पण तेथील कडक सुरक्षा व्यवस्था पाहून त्यांनी चिमाला सावध केले आणि नंतर ‘कट’ बदलून लोकलमध्ये बॉम्ब पेरण्याचा पर्याय शोधला.स्फोट घडविण्यासाठी रुपये आणि सौदी रियाल या दोन्ही स्वरूपात पैसे धाडण्यात आले होते. स्फोट घडविण्यासाठी स्थानिक लोकांकडून सहकार्य मिळावे यासाठी भारतीय चलनाचा वापर करण्यात आला. यासाठी रिझवान डावरे याने २६ हजार रियाल हवालामार्गे दिल्याचा आणि सर्व पाकिस्तानी नंतर सौदीत निसटल्याचा अंदाज आहे.इंटरपोलच्या माहितीनुसार, राहील शेख व रिसवान डावरे हे दोघे हवालामार्गे पाकमधून पैसा ब्रिटनमध्ये आणत, तेथून दुबईला धाडत. दुबईहून पैसा स्फोटांसाठी मुंबईला पाठविला गेला, असे सांगण्यात आले; पण राहिल शेखची गैरसमजातून स्थानबद्धता झाल्याचे नंतर निष्पन्न झाले.