शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी महिलेची अकोल्यात परवड

By admin | Updated: May 3, 2016 02:23 IST

मूळची पाकिस्तानातील कराचीची रहिवासी असलेली रुकसाना बानो (५३) ही महिला गेल्या दहा वर्षांपासून भारतात रानोमाळ भटकत आहे. अकोल्यातील मो. रफिक शेखानी याने २००४ साली

अकोला : मूळची पाकिस्तानातील कराचीची रहिवासी असलेली रुकसाना बानो (५३) ही महिला गेल्या दहा वर्षांपासून भारतात रानोमाळ भटकत आहे. अकोल्यातील मो. रफिक शेखानी याने २००४ साली निकाह करून तिला भारतात आणले; परंतु नंतर तिची जबाबदारी नाकारली. आता कराचीला परत जाण्यासाठी जमापुंजी नाही आणि व्हिसाची मुदतही संपलेली असल्याने तिची परवड सुरू आहे.रुकसाना बानो सध्या आकोट फैल पोलिसांच्या ताब्यात आहे. जुनागढ पोलिसांनी तिला अकोल्यात सोडले. २००४ मध्ये अकोल्यातील आकोट फैलात राहणारा मो. रफिक शेखानी कराचीमध्ये टेलिकॉम कंपनीत नोकरीनिमित्त कराचीत गेला होता. तेथे त्याने रुकसानाशी निकाह केला. तीन वर्षे पाकिस्तानात राहिल्यानंतर हे दाम्पत्य मुंबईत आले. तेथे काही वर्षे राहिल्यानंतर ते गुजरातमधील विसादरमध्ये राहू लागले. दरम्यान, रफिकने तिला दूर सारले. त्यामुळे रुकसानावर बेघर होण्याची वेळ आली. याचदरम्यान तिच्या पाच वर्षांच्या व्हिसाचा कालावधी संपला. त्यामुळे तिला जुनागढ पोलिसांनी अटक केली. दोन महिन्यांनी जुनागढ व भावनगरच्या काही नागरिकांची मदत घेत, तिने जामीन मिळविला. त्यानंतर जुनागढ पोलिसांनी तिला अकोल्यात आणून सोडले. अकोल्यात घरी गेल्यावर तिला कुलूप दिसले. पोलिसांनी तिच्या सावत्र मुलाला बोलाविले; परंतु त्याने रुकसानाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता तिने पाकिस्तानात परत जाण्यासाठी मनाची तयारी केली आहे. सध्या रुकसानाला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून व्हिसाची मुदत वाढवून मिळाली आहे. त्यामुळे ती येथे वर्षभर राहू शकते.पोलिसांनी सांगितले की, रुकसानाचा सावत्र मुलगा बाहेरगावी गेल्याने त्यांच्या घराला कुलूप आहे. मुलाला विचारणा केल्यावर त्याने आईला सांभाळण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र तिची पाकिस्तानात जाण्याची इच्छा असेल, तर पोलीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला पाकिस्तानात पाठवतील.