शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी महिलेची अकोल्यात परवड!

By admin | Updated: May 3, 2016 02:12 IST

कराचीत झाला होता विवाह; नव-याने टाकले आणि व्हिसाची मुदतही संपली.

अकोला : मूळची पाकिस्तानातील कराचीची रहिवासी असलेली रुकसाना बानो (५३) ही महिला गेल्या दहा वर्षांपासून भारतात रानोमाळ भटकत आहे. अकोल्यातील मो. रफिक शेखानी याने २00४ साली निकाह करून तिला भारतात आणले; परंतु नंतर तिची जबाबदारी नाकारली. आता कराचीला परत जाण्यासाठी जमा पुंजी नाही आणि व्हिसाची मुदतही संपलेली असल्याने तिची परवड सुरू आहे.रुकसाना बानो सध्या आकोट फैल पोलिसांच्या ताब्यात आहे. जुनागढ पोलिसांनी तिला अकोल्यात आणून सोडले. २00४ मध्ये अकोल्यातील आकोट फैलात राहणारा मो. रफिक शेखानी कराचीमध्ये टेलिकॉम कं पनीत नोकरीनिमित्त कराचीत गेला होता. तेथे त्याने रुकसानाशी निकाह केला. तीन वर्षे पाकिस्तानात राहिल्यानंतर हे दाम्पत्य मुंबईत आले. तेथे काही वर्षे राहिल्यानंतर ते गुजरातमधील विसादरमध्ये राहू लागले. दरम्यान, रफिकने तिला दूर सारले. त्यामुळे रुकसानावर बेघर होण्याची वेळ आली. याचदरम्यान तिच्या पाच वर्षांच्या व्हिसाचा कालावधी संपला. त्यामुळे तिला जुनागढ पोलिसांनी अटक केली. दोन महिने तिने कारागृहात काढले. जुनागढ व भावनगर येथील काही नागरिकांची मदत घेत, तिने जामीन मिळविला. त्यानं तर जुनागढ पोलिसांनी तिला अकोल्यात आणून सोडले. अकोल्यात घरी गेल्यावर तिला कुलूप दिसून आले. पोलिसांनी तिच्या सावत्र मुलाला बोलाविले; परंतु त्याने रुकसानाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता तिने पाकिस्तानात परत जाण्यासाठी मनाची तयारी केली आहे. मला कराचीला पोहोचवा, अशी विनंती ती पोलिसांना करीत आहे. पोलीस म्हणतात, कुटुंबीय स्वीकारण्यास तयार!पोलिसांनी सांगितले की, रुकसानाचा सावत्र मुलगा बाहेरगावी गेल्याने त्यांच्या घराला कुलूप आहे. मुलाला विचारणा केल्यावर त्याने रुकसानाला सांभाळण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र तिची पाकिस्तानात जाण्याची इच्छा असेल, तर पोलीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला पाकिस्तानात पाठवतील.रुकसानाला राहण्याची परवानगीसध्या रुकसानाला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून व्हिसाची मुदत वाढवून मिळाली आहे. त्यामुळे ती येथे वर्षभर राहू शकते.