पुणे : पाकिस्तानी लष्कराने श्रीलंकेला भेट दिलेले आठ घोडे घेऊन श्रीलंकेकडे निघालेल्या विमानात अचानक बिघाड झाल्यामुळे पुण्याच्या लोहगाव विमानतळावर ‘इमर्जेन्सी लॅन्डिंग’ करावे लागले. या ‘अश्वबंधा’मुळे पाकिस्तान आणि श्रीलंकेमधील लष्करी सहकार्य समोर आले आहे. सध्या हे घोडे हडपसरच्या रेसकोर्समध्ये ठेवण्यात आले आहेत. श्रीलंकेच्या लष्कराचे १३ सैनिक आणि पाकिस्तानी लष्कराचा १ मेजर या विमानासोबत आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी इस्लामाबादमधून श्रीलंकेच्या वायुदलाचे कोलंबो बाऊंड सी - १३० हे विमान कोलंबोकडे निघाले होते. मात्र, पुण्याच्या हवाई हद्दीमधून जात असताना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पुणे एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी)शी संपर्क साधून विमान उतरवण्याची परवानगी मागण्यात आली. भारतीय वायुदलाकडून ही बाब दिल्लीतील मुख्यालयाला कळविण्यात आली. गुप्तचर संघटनेकडून (आयबी) खातरजमा केल्यानंतर विमान उतरविण्यासाठी परवानगी देण्यात आली.
पुण्यात उतरले पाकिस्तानी घोडे!
By admin | Updated: May 8, 2015 04:44 IST