शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मुंबईतून पाकिस्तानी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 05:38 IST

जुहूमध्ये गेल्या दहा वर्षांपासून राहत असलेले २६ पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जुहूमध्ये गेल्या दहा वर्षांपासून राहत असलेले २६ पाकिस्तानी नागरिक अचानक बेपत्ता झाले आहेत. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ‘इसिस’च्या सूत्रधारासह पाकिस्तानी हेर संस्था ‘आयएसआय’च्या तीन एजंटांच्या मुसक्या नुकत्याच आवळल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबईतील २६ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने तपास यंत्रणांची झोप उडाली असून या प्रकरणाचा तपास ‘एटीएस’ने सुरू केला आहे. तथापि, एकही वरिष्ठ पोलीस अधिकारी या विषयावर बोलण्यास तयार नसल्याने गूढ वाढले आहे. मुंबईत आयएसआयचे आणखी तीन एजंट लपलेले असल्याची शक्यता उत्तर प्रदेशातील एटीएसने वर्तवल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने त्यावरून तपास सुरू केला असता जुहू परिसरातील या २६ पाकिस्तानी नागरिकांचा गेल्या दोन आठवड्यांपासून ठावठिकाणा लागत नसल्याचे आढळले. भारतातील कोणत्या शहरात कोणाच्या घरी वा हॉटेलमध्ये राहणार आहोत, कोणत्या ठिकाणी जाणार आहोत, याबाबतची स्पष्ट माहिती ‘सी फॉर्म’द्वारे देण्याचे बंधन भारतात येणाऱ्या प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर आहे. ‘सी फॉर्म’च्या आधारे पाकिस्तानी नागरिकांचा शोध पोलिसांनी सुरू केला असता संबंधित पत्त्यावर ते सापडलेच नाहीत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांच्या वास्तव्यासारख्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील विषयात अत्यंत हलगर्जीपणे ‘सी फॉर्म’ भरून घेण्याचा उपचार पार पाडण्यात आल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर, सी फॉर्मवरील तपशीलाची नियमित खातरजमा करण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याची गंभीरबाबही यातून समोर आली आहे. >‘सी फॉर्म’च्या आधारे शोध‘सी फॉर्म’च्या आधारे या पाकिस्तानी नागरिकांचा पत्ता मिळवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्यांना शोधण्यात अपयश आले. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आणि तपास यंत्रणांनी आपल्या शोधमोहिमेची गती वाढवली. जुहूसह मुंबईतील अन्य परिसरातील वेगवेगळ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि संशयित ठिकाणांची तपासणी करून पोलीस या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. >वरिष्ठांकडून प्रतिसाद नाहीते पाकिस्तानी नागरिक नाव बदलून राहत आहेत का? ते मुंबईतच आहेत की बाहेर? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर आहेत. याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, कायदा व सुव्यवस्थाचे सहआयुक्त देवेन भारती यांच्यासह एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीन वाढले आहे.>पाककडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघनजम्मू-काश्मिरातील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून तोफांचा जोरदार मारा केला. त्यात दोन नागरिक ठार झाले, तसेच तीन जण जखमी झाले.१0 मेपासून पाककडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची ही तिसरी घटना आहे. त्यात आता पर्यंत तीन जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेजवळ असलेल्या शाळा बेमुदत काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. सरहद्दीवरील गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.