शरद पवार : भाजपा-संघाला पुन्हा हिणवले
कल्याण : लोकसभेत सदरा मिळाला आता राज्याची सत्ता देऊन पायजमा द्या, या राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चपराक लगावली आहे. ‘पायजमा कशाला मागता, हाफ चड्डी आहे ना!’ असे उपरोधिक वक्तव्य त्यांनी केले. ठाणो दौ:यावर आलेल्या पवार यांनी कल्याणात पत्रकारांशी संवाद साधला.
याआधीही ‘हाफ चड्डीवाल्यांच्या हातात देश देणार का,’ असे विधान पवार यांनी केले होते. ‘मोदी हे देशाचे असे पहिले पंतप्रधान आहेत, जे प्रचारात विकासाऐवजी व्यक्तिगत टिप्पणीवर भर देत आहेत. राष्ट्रवादी संपर्कात असल्याचे दोन्ही ठाकरेंचे भाष्य सत्यावर आधारित नाही़
देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्री नाही - पवार
ठाणो- पाकिस्तानकडून वारंवार सीमेवर हल्ले होत असतांना भारताला पूर्ण वेळ काम करणारा संरक्षण मंत्री नाही अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.
सीमेवरील हल्याचे राजकारण करायचे नाही, परंतु हे हल्ले यापुढे होणार नाहीत, याची काळजी मात्र पंतप्रधांनी घ्यावी. यापूर्वी राज्याच्या विधानसभा निवडणूकीत निमित्ताने बहुतेक पंतप्रधानांच्या दोन चार सभा झाल्यात. परंतु मोदी हे महाराष्ट्रात विक्रमी अशा 25 सभा घेत असल्याचा आनंद आहे.