शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘सैराट’ जोडीचे पोलिसांनी लावले लग्न

By admin | Updated: June 30, 2016 20:56 IST

आयुष्यभराची साथ निभविण्याचा निर्णय घेणाऱ्या ‘सैराट’ जोडीला पोलिसांनी कायद्याने मदतीचा हात दिला. सैन्य दलातील जवान अन महाविद्यालयीन युवतीचे प्रेम पोलिसांच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाले

सुनील चौरे

हदगाव, दि. ३०  : समजून... उमजून... आयुष्यभराची साथ निभविण्याचा निर्णय घेणाऱ्या ‘सैराट’ जोडीला पोलिसांनी कायद्याने मदतीचा हात दिला. सैन्य दलातील जवान अन् महाविद्यालयीन युवतीचे प्रेम पोलिसांच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाले. शेवटी कुटुंबियांचे मन परिवर्तन करीत पोलिसांनी हा अनोखा विवाह सोहळा ठाण्यातच घडवून आणला.हदगाव शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात पोलिसांनीच आंतरपाठ धरला. शेवंतीही आणली. शेवट गोड झालेल्या सैराट जोडीच्या कहाणीला २७ जून रोजी कलाटणी मिळाली होती. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरला ढगफुटी झाली. त्याच दिवशी एका कुटुंबातील महाविद्यालयीन युवती घरातून निघून गेली होती. काकाकडे शिक्षणासाठी राहत असलेली पूजा शेजारी राहणाऱ्या शंकरची मनोमन पूजा करीत होती. गांभीर्यपूर्वक एकमेकांना आयुष्याचा साथी करण्याचा विवेकी निर्णय जोडीने घेतला. दरम्यान शंकर सैन्य दलात दाखल झाला होता. परंतु दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मुलगी सज्ञान असली तरी तिचे शिक्षण सुरु असल्याने घरच्यांकडून संमती मिळालेली नव्हती. शेवटी तीन दिवसापासून सैराट झालेली ही जोडी हदगावच्या पोलिस ठाण्यात हजर झाली. दोघांनीही पोलिस निरीक्षक एस.एस. आमले यांना आपली कथा सांगितली. कायद्याने दोघेही सज्ञान. विचाराने पक्के. आयुष्यभराची साथ निभविण्याची तयारी अन् गांभीर्याने सैराट झालेले मन पोलिसांनाही भावले. त्यांनी मुला-मुलीच्या आई-वडिलांना, नातेवाईकांना बोलविले. त्यांची समजूत घातली. मराठा सेवा संघाचे पाटील आम्रते, गणेश बलदेवा, सुनीलभाऊ सोनुले, दत्तरामजी सुकळकर, गजानन पाटील यांनीही नातेवाईकांचे मन परिवर्तन केले. बघता-बघता पोलिस ठाण्याला मंगल कार्यालयाचे रुप आले. कार्यकर्ते, पत्रकार, नगरसेवक अशी वऱ्हाडी मंडळी जमली. पोलिस निरीक्षक आमले व गजानन पाटील यांनी वधु-वरांचे कपडे घेतले. सर्व काही रितिरिवाजाने पार पाडले. ज्येष्ठांनी आशिर्वाद दिले.