शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

लोकमत समूहाचे फोटो एडिटर सुधारक ओलवे यांना पद्मश्री

By admin | Updated: January 26, 2016 03:29 IST

लोकमतचे फोटो एडिटर सुधारक ओलवे यांच्या छायाचित्र क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

लोकमतचे फोटो एडिटर सुधारक ओलवे यांच्या छायाचित्र क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सुधारक ओलवे तीन दशकांहून अधिक काळ छायाचित्रण क्षेत्रामध्ये कार्यरत असून, त्यांनी विविध सामाजिक विषय फोटोंमधून मांडले आहेत. झारखंडमधील माता-बालमृत्यू, कामाठीपुरा येथील शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांचे जीवन, सफाई कामगार, मेघालयातील आदिवासींची स्थिती अशा विविध विषयांमधून त्यांनी सामाजिक जाणीव प्रकट केली आहे. ओलवे यांनी दोनवेळा भारतभ्रमण केले आहे, तसेच परदेशातही छायाचित्रण केले आहे.> लेन्समागची सुधारक दृष्टी...!लोकमत वृत्तपत्त समूहाचा फोटो एडिटर सुधारक ओलवे याचं नाव पद्मश्री किताब जाहीर झालेल्यांच्या यादीत झळकलं. लोकमत परिवारासाठी ही कमालीची आनंदाची आणि तितकीच अभिमानाची बातमी ठरली. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या लोकमतमधल्या प्रत्येकाचा उर आनंदानं भरून आलेला. पण हा आनंद ज्याच्यामुळं झाला, तो सुधारक या घडीला जर्मनीत आहे. त्याच्यापर्यंत या भावना पोहोचल्या. इथं त्याच्यासाठी झालेला आनंद अवर्णनीय आहे.पद्मश्रीसाठी त्याची निवड झाली यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. हा सन्मान जितका त्याच्या फोटोग्राफीचा आहे, तितकाच किंवा त्याहून काकणभर जास्तच लेन्समागच्या त्याच्या सुधारक दृष्टीचा आहे. नवकोट नारायणांची संपत्ती, डोळे दिपवणारं ऐश्वर्य टिपण्यात सुधारकचं मन कधी रमलं नाही. आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या या फोटोग्राफरचा जीव कायम वंचितांच्या प्रतिष्ठेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी जळत राहिलाय. बरं ही भावना कोरड्या तत्वज्ञानासारखी नाही. सुधारकनं स्वत: आधी केलं मग सांगितलं.आजच्या घडीला जर्मनीत असलेला हा फोटोग्राफर जग पादाक्र ांत करून आलाय. वॉशिंग्टनपासून अ‍ॅमस्टरडॅमपर्यंत आणि ढाक्यापासून दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी त्याच्या फोटोग्राफसची प्रदर्शनं झाली. पण याचा जीव घुटमळतो, तो भारताच्या कानाकोपऱ्यात आजही सामाजिक न्यायापासून वंचित राहिलेल्यांच्या आयुष्याभोवती. जे जिणं आपण औटघटकेपुरतंही जगू शकत नाही, ते जगत राहणाऱ्या, तुमच्या आमच्या सुखकर आयुष्यासाठी नरकयातना भोगणाऱ्या कष्टकऱ्यांच्या असह्य दिनक्र माभोवती. टीचभर पोटासाठी रेड लाइट एरियात स्वत:चं आयुष्य अंधारात ढकलणाऱ्या हजारो अनाम मुली-बायकांच्या अगतिकतेभोवती. अकोल्यातून मुंबईत आलेल्या सुधारकचे डोळे संपत्तीच्या प्रदर्शनानं दिपत नाहीत, पण सामाजिक अन्यायाच्या दर्शनानं नक्की पाणावतात.हे सारं त्याच्या सुधारक दृष्टीनं वेळोवेळी टिपलं. ते दाहक सत्य खूप बोलकं होतं. तरीही तो स्वत: त्याविषयी संधी मिळेल, तेव्हा बोलत राहिला. आजही बोलतो. त्याच्या मनात शोषित पीडितांविषयी असलेली कणव अस्सल आहे. तो स्वत: आजही समाजातला सर्वात तळातला माणूस असल्यासारखा वागतो, बोलतो. मुख्य म्हणजे कृती करतो.कोणताही अभिनिवेश न ठेवता तो मुंबईतल्या सफाई कामगारांच्या मुलांसाठी दर वीकेण्डला विनामूल्य फोटोग्राफीचं शिबिर चालवतो. तो स्वत:ला रस्त्यावरचा मानतो. आणि रस्त्यावरच्या सामान्यातल्या सामान्य माणसासाठी आपली कला वापरतो.ज्या दिवशी तो कॅमेरा क्लिक करत नाही, त्या दिवशी तो अस्वस्थ होतो. एकही चांगला फोटो टिपला नाही म्हणजे दिवस वाया गेला असं त्याला वाटतं...ती त्याच्यातल्या अस्वस्थ फोटोग्राफरची आणि तितक्याच संवेदनशील माणसाची ओळख आहे.सुधारकला नीट ओळखणारा कुणीही त्याच्या साध्या राहणीवरनं त्याची परीक्षा करीत नाही. त्याच्या हातातला कॅमेरा सोडला, तर त्याला ब्रॅण्डचं ना फॅड आहे, ना वेड. आता तर तो स्वत:च ब्रॅण्ड बनलाय...सुधारक तुला मिळालेल्या या पोचपावतीबद्दल लोकमत परिवाराचा उर आनंदानं भरून आलाय...तुझ्या प्रत्येक चाहत्याच्या मनात हीच भावना असणार. जिथे मराठी तिथे लोकमत ही ओळख बनलेल्या आपल्या समूहाच्या वतीनं तुझं मन:पूर्वक अभिनंदन.